Premium

लालू यादवांच्या राजदकडून नव्या संसदेची शवपेटीशी तुलना; भाजपा नेते म्हणाले, “हेच तुमचं भविष्य”

लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल या पक्षाने संसदेच्या नवीन इमारतीची तुलना शवपेटीशी केली आहे.

RJD Tweet
राष्ट्रीय जनता दलने ट्विटरवर शेअर केलेले फोटो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संसदेच्या नव्या इमारतीचं लोकार्पण नुकतंच पार पडलं. पूर्वीपेक्षा मोठी आणि आकर्षक अशी नवी संसद भारताला मिळाली आहे. परंतु संसदेच्या नवीन इमारतीचं उद्घाटन पंतप्रधानांऐवजी राष्ट्रपतींच्या हस्ते व्हायला हवं होतं, असं म्हणत देशातल्या २० विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार घातला आहे. विरोधकांनी या कार्यक्रमावरून सरकारवर टीकाही केली आहे. बिहारमधील सत्ताधारी पक्ष राष्ट्रीय जनता दलनेदेखील या कार्यक्रमावर टीका केली आहे. तसेच संसदेच्या नव्या इमारतीची थट्टा उडवली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लालू प्रसाद यादव यांचा पक्ष राष्ट्रीय जनता दलने देशाच्या नव्या संसद भवनाची तुलना शवपेटीशी केली आहे. पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून त्यांनी दोन फोटो शेअर केले आहेत. यापैकी पहिला फोटो शवपेटीचा तर दुसरा फोटो नव्या संसदेचा आहे. राजदने “हे काय आहे?” असा प्रश्न कॅप्शनमध्ये उपस्थित केला आहे

दरम्यान, या ट्वीटनंतर बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी राजदवर पलटवार केला आहे. सुशील मोदी यांनी एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. याद्वारे त्यांनी राष्ट्रीच जनता दलावर निशाणा साधला. तसेच शवपेटीवाल्या ट्वीटवर प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा >> ”देशात राज्यसभा आहे की नाही?” नव्या संसदेच्या उद्घाटनावरून सुप्रिया सुळेंचा मोदी सरकारला प्रश्न; म्हणाल्या, “कार्यक्रमाला गेलो असतो, पण…”

सुशील कुमार मोदी म्हणाले की, राजदचे खासदार आता राजीनामा देणार का? संसदेची तुलना शवपेटीशी केल्याबद्दल राजदवर देशद्रोहाचा खटला दाखल करायला हवा. राजदच्या या ट्वीटवरून त्यांची मानसिकता दिसते. हा पक्ष नेहमीच देशाचा अपमान करत आला आहे. राजदने जे दोन फोटो शेअर केले आहेत, त्यापैकी दुसरा फोटो म्हणजेच भारतीय संसदेचा फोटो हे भारताचं भविष्य आहे आणि पहिला फोटो म्हणजेच शवपेटीचा फोटो हे राजदचं भविष्य आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-05-2023 at 12:40 IST
Next Story
New Parliament Building Inauguration: शरद पवारांची संसद भवन सोहळ्यावर पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “पुन्हा एकदा देशाला…!”