scorecardresearch

Premium

पाणी प्रश्नाबाबत रोहित पाटलांचा ठाम निर्धार; म्हणाले, “आबांचा जो इतिहास…”

सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. या योजनेसाठी ताईंनी काय प्रयत्न केला असा प्रश्न असेल तर त्यांनी या व्यासपीठावर यावं आणि पुरावे घेऊन जावेत, असं रोहित पाटील म्हणाले.

R R Patil And Rohit Patil
पाणीप्रश्नाबाबत रोहित पाटील काय म्हणाले?(फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

टेंभू सिंचन योजनेत तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील १७ गावांचा समावेश करावा या आणि इतर मागण्यांसाठी आर.आर. पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील आणि त्यांचा मुलगा रोहित पाटील यांनी उपोषणाचं हत्यार उपसलं होतं. परंतु, उपोषणाला सुरुवात होण्याआधीच सरकारने त्यांची मागणी मान्य केली आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणावर रोहित पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. या योजनेसाठी ताईंनी काय प्रयत्न केला असा प्रश्न असेल तर त्यांनी या व्यासपीठावर यावं आणि पुरावे घेऊन जावेत. ही मागणी करत असताना खरंतर या व्यासपीठावर मी काय भाषण करणार याची सर्वांना प्रतिक्षा आहे. परंतु, पाण्यामध्ये राजकारण न करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. कोणावरही आरोप न करण्याचा निर्णय घेतला आहे. पण ज्या दिवशी सुप्रिमो मंजूर होईल, त्या दिवशी निश्चितपणे असा इतिहास घडवू, जो इतिहास तुम्ही आबांचा काढणार होता, तो इतिहास आम्ही तुमचा काढल्याशिवाय राहणार नाही”, असं रोहित पाटील म्हणाले.

Rahul Narvekar and Ulhas Bapat
“क्षुल्लक निर्णय घ्यायला…”, १६ आमदार अपात्रतेप्रकरणी घटनातज्ज्ञ उल्हास बापटांची थेट राहुल नार्वेकरांवर टीका
uddhav thackeray and ajit pawar
“अजितदादा माझ्यावेळेला चांगले होते, पण…”, नाराजी नाट्यावर उद्धव ठाकरेंचा टोला; म्हणाले, “ज्यांच्या उरावर…”
Uddhav Thackeray eknath shinde 1
“ये डर अच्छा हैं”, एकनाथ शिंदेंचा परदेश दौरा पुढे ढकलल्यानंतर ठाकरे गटाची प्रतिक्रिया, म्हणाले…
eknath-shinde-and-aditya-thackeray-1
तुम्ही ठाण्यातून निवडणूक लढवणार का? या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणाले…

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या आमदार सुमन पाटील यांनी आज उपोषणाचा इशारा दिला होता. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्या बेमुदत उपोषण करणार होत्या. परंतु, त्याआधीच टेंभू विस्तारीत योजनेसाठी ८ टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्यास महाराष्ट्र शासनाकडून अंतिम मंजुरी मिळाली आहे. परंतु, टेंभू योजनेच्या अहवालाला तृतीय सुधारीत मान्यता मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवणार असल्याची भूमिका सुमन पाटील यांनी घेतली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rohit patils firm determination regarding water issue said the history of aba sgk

First published on: 02-10-2023 at 13:48 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×