भाजपा नेते, मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी एकेरी उल्लेख करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याव्यतिरिक्त एकाही नेत्याने चकार शब्द काढला नव्हता. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पक्षातील नेत्यांना खडेबोल सुनावले आहेत.
“महाराष्ट्रात काही नवीन तयार झालेले नेते खालच्या पातळीवर जाऊन बोलत पदाची अपेक्षा करत असावेत. भाजपाचे स्वयंघोषित नेते खालच्या पातळीवर बोलतात तेव्हा वरिष्ठ नेते शांत असतात. याचा अर्थ त्यांचेही याला पाठबळ असल्याचं दिसतं. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती,” अशा शब्दांत रोहित पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे.
“आम्ही कार्यकर्ता म्हणून लढत राहू”
“शरद पवारांनी अनेक नेत्यांना मोठं केलं. पण, शरद पवार
सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?
भाजपात ओबीसींचा सन्मान होत नाही, असा आरोप राष्ट्रवादीने केला होता. याला प्रत्युत्तर देताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, “ओबीसांचा पंतप्रधान झाल्याने यांच्या ( काँग्रेस-राष्ट्रवादी ) पोटात दुखत आहे. काँग्रेसचा पंतप्रधान कोण आहे? तर एक ब्राह्मण आहे, जो जाणवं घालतो. राष्ट्रवादी काँग्रेसचा २२ वर्षांपासून अध्यक्ष कोण आहे? मराठा शरद पवार, तो आम्हाला अक्कल शिकवणार का? जनतेलाही हे समजलं पाहिजे की, मायावी चेहरे घेऊन बसलेल्या या लोकांपासून त्यांनी दूर राहिलं पाहिजे. हे लोक आपल्यासमोरचा मोठा धोका आहेत.”
“त्यांना आपली चौंडी काढून घ्यायची होती”
एका कार्यक्रमात बोलताना गोपीचंद पडळकरांनी सांगितलं की, “गेल्यावर्षी जयंतीला पवारांनी मस्ती केली, केली का नाही? यावर्षी पवार का नाही आला? पवार ४ वेळा मुख्यमंत्री, १२ वर्षे केंद्रात मंत्री होता, मागचं मला माहिती नाही. राज्यात १९९९ पासून २०१४ पर्यंत त्यांचं सरकार होतं, ते एकदाही चौंडीला आले नाहीत. गेल्यावर्षी त्यांना आपली चौंडी काढून घ्यायची होती,” असा आरोप गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांवर केला आहे.
हेही वाचा : “अर्थमंत्री असताना अजित पवारांनी…”, ‘त्या’ विधानावरून शिंदे गटातील खासदाराचा गंभीर आरोप
“सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून…”
मुनगंटीवार आणि पडळकरांच्या विधानावर अजित पवारांनी म्हटलं की, “संस्कार होतील, तसेच ते बोलणार आणि वागणार. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. पण, दुसऱ्यांकडून कशाचीही अपेक्षा नाही. त्यावर बोलू शकत नाही,” असे म्हणत अजित पवारांनी गोपीचंद पडळकरांचा नामोल्लेख करणं टाळलं आहे.
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit pawar angry ncp leader because no reply mungantiwar and padalkar critics sharad pawar ssa