Rohit Pawar On Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं, तर महाविकास आघाडीला पराभवाला सामोरं जावं लागलं. तर महायुतीला बहुमत मिळाल्यामुळे राज्यात आता महायुतीचं सरकार लवकरच स्थापन होईल. सध्या सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरु आहेत. पण निवडणुकीचा निकाल लागून आज पाच दिवस झाले पण अद्यापही राज्यात सत्तास्थापन झालेली नाही. यातच आधी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावर दावा केल्याची चर्चा होती. मात्र, त्यानंतर पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे यांनी भाजपाचे दिल्लीतील नेते जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल अशी भूमिका जाहीर केली.

अशीच भूमिका अजित पवार यांनीही जाहीर केली. त्यामुळे भाजपाचा मुख्यमंत्री होईल हे आता निश्चित झाल्याचं बोललं जात आहे. पण मुख्यमंत्री नेमकी कोण होईल? हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान, या सर्व घडामोडींवर राजकीय नेते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. आता यावर राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. तसेच अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदासंदर्भातही त्यांनी मोठं विधान केलं. ‘अजित पवार मुख्यमंत्री झाले तर मी स्वतः जाईन आणि अभिनंदन करून त्यांचं दर्शन घेईन’, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…

हेही वाचा : निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडीत बिघाडी? थेट काँग्रेसचं नाव घेऊन ठाकरेंच्या नेत्याची टीका!

रोहित पवार काय म्हणाले?

“गेल्या काही दिवसांपासून मी असं ट्वीट करत आहे की, या महाराष्ट्राची लोकशाही ही गुजरातच्या लोकशाहीत अडकत आहे की काय? असा प्रश्न पडतो. मात्र, याबाबत मी खूप काही माहिती लोकांसमोर आणली. प्रत्येक माहितीची शाहनिशा करता येईल. लोकांची चर्चा मी सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडतो. तुम्ही एखाद्या टपरीवर गेलात किंवा एखाद्या लग्नात जा आणि लोकांना विचारा की निवडणुकीचा जो निकाल लागला तो स्वीकारण्यासारखा आहे का? मग लोकच तुम्हाला सांगतील की काहीतरी गडबड आहे. आता आमचं मत एवढंच आहे की लोकशाही जिंवत ठेवायची असेल तर नेमकं काय गडबड आहे याची शाहनिशा झाली पाहिजे”, असं रोहित पवार यांनी म्हटलं.

“महाराष्ट्रातील प्रश्नासंदर्भात एखादा निर्णय याआधी महाराष्ट्रातच घेतला जायचा. पण आता मुख्यमंत्रिपदाचा निर्णय हा दिल्लीत घेतला जातोय. चार-चार दिवस दिल्लीत जाऊन थांबावं लागतंय. आता दोनशे पेक्षा जास्त आमदार असतानाही मुख्यमंत्री कोण होईल? याचा निर्णय त्यांना घेता येईना. मला वाटायचं की एकनाथ शिंदे यांना संधी दिली जाईल. पण मी काल पत्रकार परिषद पाहिली. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं नाव एकदाही घेतलं गेलं नाही. तसंच अजित पवारांचंही नाव घेतलं गेलं नाही. फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचं नाव घेतलं. कालच्या पत्रकार परिषदेनंतर आता एकनाथ शिंदे यांना संधी दिली जाईल असं वाटत नाही. कदाचित ते केंद्रात मंत्री बनतील आणि त्यांचे चिरंजीव राज्यात उपमुख्यमंत्री बनतील”, असा मोठा दावाही रोहित पवार यांनी केला.

“राज्यात भाजपाचा मुख्यमंत्री होईल. मग देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील की दुसरं कोणी मुख्यमंत्री होईल हे आपल्याला आता सांगता येणार नाही. तसेच जर अजित पवार मुख्यमंत्री होणार असतील तर मी त्यांचं अभिनंदन करेन, शुभेच्छा देईल. पण खरंच त्यांना मुख्यमंत्री केलं जाणार आहे का? आज आणि उद्या आपल्याला थांबायचं आहे. जर खरंच त्यांना मुख्यमंत्री पद दिलं तर मी स्वत: जाईन अभिनंदन करेन आणि मी त्यांचं दर्शन घेईन. माझे काका म्हणून आणि मी त्यांचा पुतण्या म्हणून”, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

Story img Loader