राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रो कंपनीतील दोन प्लांट बंद करण्याची नोटीस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजावली होती. यासाठी रोहित पवार यांना ७२ तासांची मुदत देण्यात आली होती. या विरोधात रोहित पवारांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर आता उच्च न्यायालयाने रोहित पवार यांना दिलासा दिला आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मध्यरात्री २ वाजता बारामती अ‍ॅग्रोचे दोन प्लांट बंद करण्याचे निर्देश दिले होते. या विरोधात रोहित पवार यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना बारामती अ‍ॅग्रोवर ६ ऑक्टोबरपर्यंत कोणतीही कारवाई करू नये, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने प्रदूषण मंडळाला दिला आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

हेही वाचा : “दबाव आणण्यासाठी नाक दाबून…”, रोहित पवारांवरील कारवाईवर यशोमती ठाकुर यांची प्रतिक्रिया

“सत्तेच्या छत्राखाली राहून सुडाचं राजकारण करणं सोपं”

यानंतर रोहित पवार यांनी उच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत. ‘एक्स’ अकाउंटवर रोहित पवार म्हणाले, “‘बारामती ॲग्रो’च्या प्लांटवर कारवाई करण्यास स्थगिती दिल्याबद्दल मी सर्वप्रथम मा. उच्च न्यायालयाचे आभार मानतो. तोडफोड करून मिळवलेल्या सत्तेच्या छत्राखाली राहून सुडाचं राजकारण करणं सोपं आहे. ते करणाऱ्यांनी करत रहावं… त्यांच्यावर सूड कसा उगवायचा याचा निर्णय निवडणुकीत जनता घेईल.”

हेही वाचा : उदय सामंतांच्या बंधुंच्या व्हॉट्सअ‍ॅप डीपीला उद्धव ठाकरेंची ‘मशाल’ ठेवल्यानं खळबळ, नेमकं काय घडलं?

“…हेच अस्र तुमच्यावरही उलटल्याशिवाय राहणार नाही”

“पण, यानिमित्ताने माझं त्यांना एक सांगणं आहे की, महाराष्ट्रात कधीही नव्हता तो राजकीय द्वेषाचा घाणेरडा पायंड तुम्ही पाडताय… एका अर्थाने राजकीय द्वेषाचे बाप तुम्ही आहात. मात्र, लोकशाहीत सामान्य जनता ही बाप असते, हे विसरू नका. त्यामुळं आज जरी तुम्ही खुशीत असलात तरी भविष्यात हेच अस्र तुमच्यावरही उलटल्याशिवाय राहणार नाही. ‘जिनके घर शीशे के होते हैं, वे दूसरों पर पत्थर नहीं फेंका करते’, असा इशाराही शायरीच्या माध्यमातून रोहित पवार यांनी विरोधकांना दिला आहे.

Story img Loader