scorecardresearch

“…तर शरद पवार भाजपाचे बाप आहेत”, रोहित पवार यांचा हल्लाबोल; म्हणाले, “ती राजकीय खेळी…”

रोहित पवार म्हणाले, भाजपाने शिवसेनेचा शिंद गट फोडला आणि हेच भाजपावाले एसी रूममध्ये बसून तमाशा बघत बसले होते.

Rahit Pawar SHarad pawar
रोहित पवार म्हणाले, पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी पक्ष फूटण्यास भाजपा जबाबदार आहे.

भारतीय जनता पार्टीचे नेते सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करत आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादीचा फूटलेला गट म्हणजेच अजित पवारांच्या गटातील नेतेही उघडपणे शरद पवारांना लक्ष्य करत आहेत. शरद पवारांवर वेगवेगळे राजकीय आरोप करत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून आमदार रोहित पवार खिंड लढवत असल्याचं पाहायला मिळत आहे. आमदार रोहित पवार यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषदेत शरद पवारांवर टीका करणाऱ्या भाजपा नेत्यांना लक्ष्य केलं. तसेच शरद पवारांचं कुटुंब आणि राष्ट्रवादी पक्ष फूटण्यास भाजपा जबाबदार असल्याचं वक्तव्य रोहित पवार यांनी यावेळी केलं आहे.

रोहित पवार म्हणाले, भाजपाची राजकीय खेळी शरद पवारांनी जुमानली नाही. भाजपाने शिवसेनेचा शिंद गट फोडला, त्यानंतर पक्षाचे दोन गट झाले. एकनाथ शिंदेंचा एक गट आणि उद्धव ठाकरे यांचा एक गट तयार झाला. हे दोन्ही गट एकमेकांच्या विरोधात अगदी खलच्या पातळीवर जाऊन बोलू लागले, टीका करू लागले. त्याच वेळी भाजपा नेते मात्र निवांत एसी रूममध्ये बसून हा सगळा तमाशा बघत बसले होते. परंतु, शरद पवारांना ६० वर्षांचा राजकीय अनुभव आहे.

gang rape
संतापजनक: मध्यरात्री घरात घुसून विवाहितेवर गँगरेप; काही तासांतच जोडप्याने उचललं टोकाचं पाऊल
couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’
Gutami sai mrunmayi
गौतमी देशपांडे ‘या’ लोकप्रिय अभिनेत्याला करतेय डेट? सई ताम्हणकरच्या कमेंटवर उत्तर देत मृण्मयी म्हणाली…
amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट

हे ही वाचा >> “पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत आले की त्याचा इव्हेंट…”, मल्लिकार्जुन खरगे यांची टीका

राष्ट्रवदीचे आमदार रोहित पवार म्हणाले, शरद पवारांचा राजकीय अनुभव मोठा आहे. अशी खेळी ते (भाजपा) जर शरद पवारांसमोर खेळत असतील तर शरद पवार हे राजकीय दृष्टीकोनातून भाजपाचे बाप आहेत. सध्या अशी परिस्थिती आहे की भाजपाला काय पाहिजे हे शरद पवारांना चांगलंच माहिती आहे. भाजपाला पाहिजे ते शरद पवार त्यांना देत नाहीत त्यामुळे त्यांची अडचण झाली आहे. भाजपा कुटुंब फोडण्यासाठी जबाबदार आहे. भाजपा ही पक्ष फोडण्यासाठी जबाबदार. त्यामुळे भाजपाबद्दल काय बोलायचं?

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-09-2023 at 15:35 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×