पंतप्रधान मोदी यांनी शरद पवारांचे नाव न घेता, त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. महाराष्ट्र हा भटकत्या आत्म्यांचा शिकार झाला असून ४५ वर्षांपूर्वी इथल्या एका बड्या नेत्याने या खेळाची सुरुवात केली, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर विरोधकांनीही आक्रमकपणे त्यांना प्रत्युत्तर दिले. दरम्यान, आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी एक यासंदर्भातील एक व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओतून पंतप्रधान मोदी यांच्यावर उपहासात्मक टीका करण्यात आली.

हेही वाचा – “धर्माच्या आधारावर आरक्षण आम्हाला मान्य नाही”; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “मोदींनी स्वत:..”

A meeting chaired by Amit Shah regarding Manipur
मैतेई, कुकींबरोबर लवकरच चर्चा; मणिपूरबाबत शहा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
Mahatma Gandhis bust in Italy
पंतप्रधान मोदींच्या भेटीआधी इटलीत महात्मा गांधींच्या पुतळ्याची खलिस्तानी कट्टरपंथीयांकडून विटंबना
Mallikarjun Kharge Said This Thing about Narendra Modi
“दुसऱ्यांच्या घरातल्या खुर्च्या उधार घेऊन..”, मल्लिकार्जुन खरगेंची पंतप्रधान मोदींवर टीका
Clarify stand on Jitendra Awhads plea to consolidate all offences High Court orders govt
श्रीरामाबाबत केलेले वादग्रस्त वक्तव्य : सर्व गुन्हे एकत्र करणाच्या आव्हाडांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा, उच्च न्यायालयाचे सरकारला आदेश
Mahadev Jankar viral video
महादेव जानकरांनी घेतली नरेंद्र मोदींची भेट, पण त्यांच्या ‘या’ कृतीने वेधलं सर्वांचं लक्ष, व्हायरल VIDEO पाहून तुम्हीही लोटपोट हसाल!
Kangana Ranuat
कंगना रणौत यांच्या कानशिलात लगावणाऱ्या कॉन्स्टेबलच्या भावाची प्रतिक्रिया; म्हणाले, “माझी बहीण…”
Manmohan Singh
मुस्लिमांचा संपत्तीवर पहिला अधिकार? मोदींच्या आरोपावर मनमोहन सिंगांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
narendra modi statement on mahatma gandhi
“गांधींना कोणी ओळखत नव्हतं, चित्रपट बनला तेव्हा त्यांना जगभरात ओळख मिळाली”; पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विधान चर्चेत!

व्हिडीओत नेमकं काय म्हटलंय?

कहानी अतृप्त आत्म्याची! असं कॅप्शन देत रोहित पवारांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. “अतृप्त आत्मे पांढरा हाफ शर्ट घालून उन्हातानात फिरत नाही, तर दिवसाला जे पाच वेळा कपडे बदलतात ते अतृप्त आत्मे असतात. संकट आस्मानी असो किंवा सुलतानी अतृप्त आत्मे मदतीला धावत नाही, तर जवान शहीद झाले, तरी जे जंगलात शुटींग करतात, ते अतृप्त आत्मे असतात. रडार दिसलं की ढगामागे आणि रडायला आलं की मंगळसुत्रामागे लपतात, ते अतृप्त आत्मे असतात. अतृप्त आत्मे महिलांच्या कल्याणासाठी धोरणात्मक निर्णय घेत नाही, तर महिलांची धिंडही कोरड्या डोळ्याने बघतात. अतृप्त आत्मे भर पावसात चिंब भिजत नाही, तर ज्यांना कॅमेरा महत्त्वाचा, ते अतृप्त आत्मे असतात. हजारो कोटींच्या विमानातून फिरले तरी स्वत:ला फकीर म्हणतात, ते अतृप्त आत्मे असतात”, अशी टीका या व्हिडीओतून करण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले होते?

पुण्यातील सभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी शरद पवारांचे नाव न घेता, त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. “महाराष्ट्र हा भटकत्या आत्म्यांचा शिकार झाला असून ४५ वर्षांपूर्वी इथल्या एका बड्या नेत्याने या खेळाची सुरुवात केली होती, तेव्हापासून महाराष्ट्रात अस्थिरता आली. अनेक मुख्यमंत्री त्यांचा कार्यकाळही पूर्ण करु शकले नाहीत. हे फक्त विरोधी पक्षालाच अस्थिर करत नाही तर आपल्या पक्षात, कुटुंबातही ते असंच करतात”, असे ते म्हणाले होते.