Premium

“थेट संविधानाला आव्हान…”, सौरभ पिंपळकरच्या ट्विटरवरील ‘त्या’ वाक्यावरून रोहित पवारांचा भाजपावर घणाघात

अमरावती शहरातील साईनगर भागात राहणारा २६ वर्षीय सौरभ पिंपळकर हा भाजपाचा कार्यकर्ता आहे.

Rohit Pawar
रोहित पवार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना ठार मारण्याची धमकी मिळाल्‍यानंतर राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. अशातच त्यांना धमकी देणारा तरुण हा अमरावतीतील भाजपाचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आली आहे. सौरभ पिंपळकर नावाच्या तरुणाने ट्विटरवरून शरद पवारांना धमकी दिली आहे. तेव्हापासून सौरभ पिंपळकरचा पोलीस शोध घेत आहेत. शरद पवारांना उद्देशून “तुमचाही दाभोलकर होणार”, अशी पोस्ट त्याने ट्विटरवर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमरावती शहरातील साईनगर भागात राहणारा २६ वर्षीय सौरभ हा भाजपाचा कार्यकर्ता आहे. त्‍याच्‍या टि्वटर अकाउंटवर त्‍याने ‘आय एम बीजेपी ॲक्टिव्हिस्‍ट, आय हेट सेक्‍यूलरिझम’ असा मजकूर लिहिला आहे. अमरावतीचे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी सौरभ पिंपळकरच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. सौरभ सध्या फरार असून गाडगेनगर पोलिसांचं एक पथक त्याचा शोध घेत आहे. हे पथक त्‍याच्‍या घरीही जाऊन आलं, परंतु तो तिथे नव्हता. त्‍याचा मोबाईलही बंद आहे.

सौरभ भाजपा कार्यकर्ता असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पार्टीवर हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार रोहित पवार यांनी पिंपळकरच्या ट्विटर बायोमधील मजकुरावरून भाजपाला लक्ष्य केलं आहे. आमदार रोहित पवार यांनी एक ट्वीट केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, आदरणीय पवार साहेबांना जीवे मारण्याची धमकी देणारा सौरभ पिंपळकर याने ट्विटर बायोमध्ये लिहिलेलं ‘आय एम बीजेपी ॲक्टिव्हिस्‍ट’ हे वाक्य पाहता आणि त्याचे भाजपाच्या आजी-माजी प्रदेशाध्यक्षांसोबतचे व्हायरल झालेले फोटो पाहता भाजपाला जबाबदारी झटकता येणार नाही.

रोहित पवार यांनी लिहिलं आहे की, सौरभने त्याच्या ट्विटर अकाउंटवर ‘आय हेट सेक्यूलरिझम’ असं लिहिलंय. हे सरळ सरळ संविधानाला दिलेलं आव्हान आहे. त्यामुळं त्याच्यावर देशद्रोहाचाही गुन्हा दाखल झाला पाहिजे. अन्यथा भाजपचं संविधानाविषयीचं प्रेम बेगडी असल्याचं सिद्ध होणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rohit pawar slams bjp over saurabh pimpalkar life threat to sharad pawar asc