महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देशातले सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचं नुकतंच एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. विरोधी पक्षाकडून मुख्यमंत्र्यांवर आणि सरकारवर सतत होणाऱ्या टीकेवरुन आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपाला चांगलंच खडसावलं आहे. या सर्वेक्षणाचा हवाला देत त्यांनी भाजपाला वाईट वाटून न घेण्याचा सल्ला दिला आहे.

रोहित पवार यांनी ट्विट करत मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारला शुभेच्छा दिल्या आहेत. तर दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी भाजपाला वाईट वाटून घेऊ नका असा सल्लाही दिला आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, उठ-सूट सरकारवर टीका करणाऱ्या भाजपाला या बातमीने आनंद होणार नाही. पण त्यांनी दुःख वाटून घेऊ नये. विशेषतः ज्या उत्तरप्रदेश सरकारचं भाजपकडून भाजपाकडून नेहमी गुणगान गायलं जातं. तिथल्या मुख्यमंत्र्यांचा या सर्वेक्षणात तब्बल पाचवा क्रमांक आहे, हे त्यांनी विसरु नये.

ajit pawar sharad pawar (3)
“…तेव्हा शरद पवार म्हणालेले अजितला राजकारण करू द्या, मी शेती करतो”, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितला १९८९ मधला प्रसंग
Loksatta chavdi happening in maharashtra politic news on maharashtra politics
चावडी: तो मी नव्हेच!
Sunita Kejriwal
‘आप’च्या ५५ आमदारांनी घेतली सुनीता केजरीवालांची भेट; मुख्यमंत्रीपदाबाबत दिला महत्त्वाचा सल्ला, म्हणाले…
AAP leader Kailash Gahlot
‘आप’ पक्षाला आणखी एक धक्का? मद्य धोरण प्रकरणात आणखी एक मंत्री ईडीसमोर हजर


मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारचं अभिनंदन करताना रोहित पवार म्हणतात, ‘प्रश्नम’ या संस्थेने देशातील १३ राज्यांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचं स्पष्ट झालं. याबाबत मुख्यमंत्री महोदयांचं मनापासून अभिनंदन! मुख्यमंत्र्यांनी आधीच सांगितल्याप्रमाणे हे महाविकास आघाडी सरकारचं यश आहे.

हेही वाचा – एकच नंबर! उद्धव ठाकरे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री; १३ राज्यांमध्ये करण्यात आला सर्व्हे

प्रश्नम या संस्थेने देशातील १३ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीबाबत मतदारांकडे सर्वेक्षण केले होते. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री म्हणून कामगिरी चांगली आहे आणि आम्ही पुन्हा त्यांना मतदान करू असं मत सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ४९ टक्के मतदारांनी नोंदवलं आहे. देशातील मुख्यमंत्र्यांच्या सर्वेक्षणात १३ राज्यांमधील सुमारे १७,५०० मतदारांना याबाबत आपली मतं विचारण्यात आली आहेत. पहिल्यांदाच मुख्यमंत्री झालेल्या उद्धव ठाकरेंनी लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत नाव पटकावलं आहे.