जळगाव जिल्ह्यातील भुसावळ रेल्वे स्थानकाच्या तिकीट आरक्षण केंद्रातून तिकिटांचा काळाबाजार करण्याच्या उद्देशाने तिकीटे खरेदी करणाऱ्याला बुधवारी अटक करण्यात आली. भुसावळ येथील सतर्कता विभाग, रेल्वे पोलीस व गुन्हे अन्वेषण पथकाने संयुक्तरित्या छापा टाकून ५ रेल्वे तिकिटांसह त्याला ताब्यात घेतले. शेख रहीम शेख इस्माईल असे त्याचे नाव आहे.

भुसावळ येथील नसरवानजी फाईल भागातील हिंदुस्थानी मशिदीजवळील शेख रहीम शेख इस्माईल याला पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला होता. त्याच्याकडून भुसावळ येथून सुरत, कल्याण, ईटारसी, नागपुरची चार तिकीटे व नागपूर येथून भुसावळसाठी एक तिकीट अशी एकूण ५ आरक्षित तिकीटे जप्त करण्यात आली. हेड कॉन्स्टेबल रोशन जमीर यांनी या कारवाईत महत्वाची भुमिका बजावली. याप्रकरणी भुसावळ रेल्वे पोलिसात त्याच्याविरुद्ध कलम १४३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस याप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त अजय दुबे, निरीक्षक विनोदकुमार लांजीवार व अतुल टोके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्‍यात आली.

Dombivli, poultry farm, Kopar railway station
डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकालगत हरितपट्ट्यात कोंबड्यांचा खुराडा, रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी
Block. Konkan Railway, trains,
कोकण रेल्वेवर ब्लॉक; रेल्वेगाड्यांचा खोळंबा
Dombivli railway station, roof platform Dombivli,
डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर छत नसल्याने प्रवाशांना उन्हाचे चटके
Mumbai Municipal Corporation, bmc, Railway Officials, Conduct Joint Inspection, railway and bmc Joint Inspection, Prevent Monsoon Waterlogging, waterloggig on train track, waterlogging on mumbai road,
रेल्वे रुळांवर पाणी साचू नये म्हणून खबरदारी, पश्चिम, मध्य रेल्वे स्थानकांवर महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनाची संयुक्त पाहणी