शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्यावर टीकास्र सोडलं होतं. अजित पवार यांनी इंदुरीकर महाराजांचे कीर्तन ऐकावं, असा खोचक सल्ला शहाजीबापू पाटलांनी दिला होता. यानंतर आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी शहाजीबापू पाटलांवर जोरदार टोलेबाजी केली आहे.

शहाजी बापू पाटील यांना गुवाहाटीपासून मुंबईपर्यंत नाच्या अशी ओळख मिळाली आहे. भविष्यात हातात तुणतुणं घेऊन ‘कशी नशिबाने थट्टा आज मांडली” हे गाणं म्हणत त्यांना गावोगावी फिरावं लागणार आहे, अशी टीका सचिन खरात यांनी केली आहे. त्यांनी एक व्हिडीओ जारी करत ही टीका केली आहे.

narendra modi uddhav thackeray (2)
मोदींनी उद्धव ठाकरेंना पुन्हा साद घातलेली? संजय राऊत म्हणाले, “दिल्लीतल्या त्या बैठकीत पंतप्रधानांनी…”
pune crime news, pune koyta gang marathi news, pune school boy koyta attack marathi news
पुणे : शाळकरी मुलावर कोयत्याने वार; अल्पवयीन मुलांसह साथीदारांवर गुन्हा
Shrimant Shahu Maharaj and Hasan Mushrif
श्रीमंत शाहू महाराजांनी निवडणुकीला उभे राहू नये असे वाटते; हसन मुश्रीफ
Dilip Mohite Patil oppose Shivajirao Adhalarao Patil
“…तर राजकारण सोडून घरी बसेन”, शिवाजीराव अढळरावांचा उल्लेख करत दिलीप मोहितेंचा अजित पवारांना इशारा

हेही वाचा- “अमित शाह हे प्रभावशाली नेते” अमोल कोल्हेंचं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?

संबंधित व्हिडीओत खरात म्हणाले, “शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी अजित पवारांना इंदुरीकर महाराजांचं कीर्तन ऐकण्याचा सल्ला दिला होता. पण शहाजीबापू पाटील तुम्ही ध्यानात ठेवा, गुवाहाटीपासून मुंबईपर्यंत तुम्ही नाच्या म्हणून प्रसिद्ध झाला आहात. त्यामुळेच शिंदे गट तुम्हाला प्रत्येक सभेत नाच्या म्हणून बोलावत आहे, हे तुम्हाला माहीत आहे. परंतु तुम्ही ज्या सांगोला तालुका विधानसभा मतदार संघाचं नेतृत्व करता, तेथील जनता तुम्हाला लवकरच घरी बसवणार आहे. कारण तुम्ही नाच्या म्हणून प्रसिद्ध झाला आहात.

हेही वाचा- “होय, त्याला फोन केला, पण…” चेंबुरच्या व्यापाऱ्याला धमकावल्याप्रकरणी छगन भुजबळांचं स्पष्टीकरण, म्हणाले…

“तुम्ही तुमच्या मतदार संघातील लोकांची काम करायचं सोडून नाच्या म्हणून राज्याभर फिरत आहात. त्यामुळे सांगोल्यातील जनता तुम्हाला लवकरच घरी बसवेल, हे तुम्ही ध्यानात ठेवा. जनतेनं तुम्हाला घरी बसवल्यानंतर, तुम्हाला हातात तुणतुणं घेऊन, ‘कशी नशिबाने थट्टा आज मांडली’ हे गाणं म्हणत गावोगावी फिरावं लागणार आहे” अशा शब्दांत सचिन खरांतांनी शहाजीबापू पाटलांवर टीकास्र सोडलं आहे.