Ramdas Athawale on Raj Thackeray: महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेच्‍या हाती सत्‍ता दिली तर एकाही मशिदीवर भोंगा दिसणार नाही, असे वक्‍तव्‍य राज ठाकरे यांनी अमरावती येथे एका जाहीरसभेदरम्यान केले होते. या वक्तव्यावर आता राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) प्रमुख रामदास आठवले यांनी एएनआय वृत्तवाहिनीशी बोलताना राज ठाकरेंच्या विधानावर टीका केली. मशि‍दीवरील भोंगे कधीही हटणार नाहीत, अशी भूमिका मांडत असताना रामदास आठवले यांनी मनसेची सत्ता कधीही येणार नाही, असे सांगितले. मनसेचा एकच आमदार निवडून येतो, तोही स्वतःच्या जीवावर निवडून येतो, असेही आठवले म्हणाले.

रामदास आठवले एएनआयशी बोलताना म्हणाले की, राज ठाकरे वारंवार अशाप्रकारचे विधान करत असतात. आमचे सरकार आले तर मशि‍दीवरील भोंगे हटविणार असे ते म्हणतात. पण मशि‍दीवरील भोंगे हटणार नाहीत आणि राज ठाकरेंची सत्ताही कधी येऊ शकत नाही. कितीही वर्ष गेले तरी राज ठाकरेंची सत्ता येऊ शकत नाही. त्यांचा एकच आमदार निवडून येतो, तोही स्वतःच्या जीवावर. मग त्यांचे सरकार कसे येणार? आणि ते कसे भोंगे हटवू शकणार?

What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…
Sada Sarvankar
Sada Sarvankar : “मला निवडणूक लढवावीच लागेल”, सदा सरवणकर हतबल; म्हणाले, “राज ठाकरेंनी माझी…”
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: दुसऱ्या टर्मसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा अजेंडा ठरला; पहिल्याच भाषणात केला उल्लेख, म्हणाले…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
devendra fadnavis on amit thackeray
अमित ठाकरेंच्या उमेदवारीवर देवेंद्र फडणवीस म्हणतात, “राज ठाकरेंनी या एका जागेवर…”
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

“मी दहशतवादी असलेल्या मुसलमानांचा नेहमीच विरोध केला आहे. पण देशावर, भारताच्या संविधानांवर प्रेम करणारे आणि हिंदूंशी बंधुभाव राखून राहणाऱ्या मुसलमानांचा विरोध करणे ठीक नाही. मशिदीत एक-दोन मिनिटांची अजान होत असते, त्यासाठी भोंगे हटविण्याची काय गरज आहे. भोंगे हटविण्यापेक्षा गरीबी हटवा, भ्रष्टाचार हटवा, भोंगे हटविण्यापेक्षा विषमता, जातीयता हटविली पाहीजे. केवळ १४० – १४५ उमेदवार उभे करून आमदार निवडून येत नसतात. मनसेचे दोनही आमदार निवडून येणार नाहीत. पण राज ठाकरे असे विधान वारंवार करत राहिले, तर माझा पक्ष भोंगे हटविणाऱ्यांना धडा शिकवल्या राहणार नाही”, असेही रामदास आठवले म्हणाले.

हे वाचा >> राज ठाकरे म्हणतात, “एकाही मशिदीवर भोंगा दिसणार नाही”

अमरावतीचे मनसेचे उमेदवार पप्‍पू उर्फ मंगेश पाटील यांच्‍या प्रचारार्थ बुधवारी रात्री सायन्‍सकोर मैदानावर आयोजित प्रचार सभेत बोलत असताना राज ठाकरे यांनी भोंग्याबाबत विधान केले. मशिदींवरचे भोंगे बंद झाले नाही, तर मशिदीसमोर हनुमान चालिसा पठण करण्‍याचा इशारा मनसेने दिला होता. त्‍यावेळी उद्धव ठाकरे हे मुख्‍यमंत्री होते. आम्‍ही आंदोलन केल्‍यानंतर भोंगे बंद झाले होते. पण, त्‍यावेळी मनसेच्‍या १७ हजार कार्यकर्त्‍यांच्‍या विरोधात गुन्‍हे दाखल करण्‍यात आले होते, ही आठवण राज ठाकरेंनी करून दिली.

Story img Loader