scorecardresearch

Premium

सातारा पुणे महामार्गावर ट्रॅव्हल्स बस मधून तब्बल २२ लाख लंपास

सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या मार्गदतशनाखाली अधिक तपास पोलिस  उपनिरीक्षक व्ही. एस. भंडारे करत आहेत.

Rs 22 lakh stolen from travel bus on satara pune highway
प्रतिनिधिक छायाचित्र

वाई: सातारा पुणे महामार्गावर थांबलेल्या ट्रॅव्हल्स मधून तब्बल २२ लाख रुपये लंपास करण्यात आले. बोपेगाव (ता वाई)गावच्या हद्दीत असलेल्या कोहिनूर हॉटेल येथे हि गाडी थांबली होती.यावेळी अज्ञाताने  एका प्रवाशाची २२ लाखाची रक्कम लाबवली.याप्रकरणी भुईंज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.   

हेही वाचा >>> “त्या चिंधीचोराने माझ्याशी…”, प्रकाश आंबेडकरांचा नारायण राणेंना टोला

67 cctv cameras for ganesh visarjan in nashik, 3500 police appointed for ganesh visarjan in nashik
नाशिकमध्ये मिरवणूक मार्गावर ६७ सीसीटीव्ही कॅमेरे, सहा ड्रोनद्वारे नजर; साडेतीन हजार अधिकारी, जवानांचा बंदोबस्तात सहभाग
pimpri chinchwad st bus accident, st bus accident chinchwad, today st bus accident in pune, st bus hits divider in chinchwad, st accident
चिंचवडमध्ये एसटी बस रस्ता दुभाजकाला धडकली; प्रवासी बचावले
police operation on National Highway buldhan
बुलढाणा: राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांची मोठी कारवाई; ७० लाखांचा गुटख्यासह एक कोटीचा मुद्देमाल जप्त
Ravindra Chavan Mumbai Goa Highway
मुंबई गोवा महामार्ग खरंच सुधारणार? रवींद्र चव्हाणांचा पाचवा दौरा!

मंगळवार दि. २६ रोजी  सकाळी ७:३० ते ८:१० वा सुमारास वाई तालुक्यातील बोपेगाव गावच्या हद्दीत साताऱ्याकडून  पुण्याकडे जाणारी खाजगी बस कोहिनूर हॉटेलच्या आवारात व्ही आर एल ट्रॅव्हल्स (केए २५ डी ४८६३ )थांबली होती.नरेंद्र प्रल्हादसिंह गिरासे ( फिर्यादी ) वय ४२ हे बाथरूमला गेले होते ते बाथरूमला जायच्या आधी त्यांच्याजवळ असणाऱ्या काळ्या रंगाची बॅग त्यांनी ट्रॅव्हल्स मध्येच ठेवली. लगेच परत ट्रॅव्हल्स जवळ आले. तेव्हा त्यांच्याजवळ असणाऱ्या बॅग व त्यामध्ये ठेवलेले सुवर्णा बिल्डकॉन कंपनीच्या मशीनरी विक्रीचे असलेले २२ लाख रुपयांची रक्कम कोणीतरी अज्ञात चोरट्यानी मुद्दाम लबाडीने चोरून नेले. म्हणून नरेंद्र गिरासे यांनी त्या अज्ञात चोरट्याच्या विरोधात भुईंज पोलीस स्टेशन रविवार (दि १) रोजी फिर्याद दाखल केली. सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या मार्गदतशनाखाली अधिक तपास पोलिस  उपनिरीक्षक व्ही. एस. भंडारे करत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rs 22 lakh stolen from travel bus on satara pune highway zws

First published on: 02-10-2023 at 20:21 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×