आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रात ‘मिशन ४५’ राबवायला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाचे केंद्रीय मंत्री महाराष्ट्रातील विविध लोकसभा मतदारसंघात जाऊन प्रचार करणार आहेत. याचाच एक भाग म्हणून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत.

या दौऱ्यात निर्मला सीतारामन भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच त्या संघटनात्मक बैठकाही घेणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी मोठं विधान केलं आहे. गेल्यावेळी एक-दोन महिने आधी संधी मिळाली असती तर बारामती लोकसभा मतदारसंघात आम्ही जिंकलो असतो, असं विधान त्यांनी केलं आहे. तसेच भाजपानं यावेळी संधी दिली तर आगामी निवडणुकीत बारामतीतून लढण्याची आपली इच्छा असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’ या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

amit shah
महाराष्ट्राला काय दिले, पवारांनीच हिशेब द्यावा! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका
maval lok sabha
अखेर मावळमधून शिवसेनेकडून खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी जाहीर
Challenge of two women candidates before Asaduddin Owaisi
ओवैसींसमोर यंदा दोन महिला उमेदवारांचे आव्हान; कसा राखणार हैदराबाद मतदारसंघ?
bhiwandi lok sabha election 2024 marathi news, bhiwandi latest news in marathi, bhiwandi lok sabha sharad pawar ncp marathi news
“यंदा भिवंडी मतदारसंघ सोपा, उमेदवाराची गफलत करु नका”, राष्ट्रवादीच्या नेत्यांचे पवारांना साकडे

हेही वाचा- २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात, फडणवीस म्हणाले “त्या १६ मतदासंघात…”

तुम्ही भाजपा नेतृत्वाखालील एनडीएमध्ये आहात, बारामतीची जागा रासपला सोडण्यात यावी, अशी मागणी तुम्ही भाजपाकडे करणार आहात का? असं विचारलं असता जानकर म्हणाले, “अजून यावर आमची काहीही चर्चा झालेली नाही. त्यामुळे आपण यावर काही बोलणं योग्य ठरणार नाही. पण एनडीएचा विचार केला तर बारामतीतून निवडणूक लढवण्याची आमची इच्छा आहे. राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने लढायला आम्ही तयार आहोत. पण भाजपानं बारामतीची जागा सोडली पाहिजे.”

हेही वाचा- विरोधी पक्षनेतेपदी अजित पवारांची निवड झाल्याने जयंत पाटील नाराज? पाटलांनी स्वत:च दिलं उत्तर, म्हणाले…

तुम्ही बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळेंचा पराभव करू शकता का? असा प्रश्न विचारला असता महादेव जानकर म्हणाले, “गेल्यावेळी मी लोकसभेच्या निवडणुकीची तयारी केवळ आठ दिवसात केली होती. त्यावेळी सुप्रिया सुळे केवळ ३४ हजार मतांनी विजयी झाल्या होत्या. तिथे एक-दोन महिने आधी संधी मिळाली असती, तर आम्ही जिंकलो असतो. त्यामुळे आगमी लोकसभा निवडणुकीत भाजपानं समर्थन दिलं तर राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर आम्ही बारामती मतदारसंघात लढू” असंही जानकर म्हणाले.