बाळासाहेब ठाकरेंचं शिवाजी पार्कवरील स्मृतीस्थळ हा तमाम शिवसेना कार्यकर्त्यांसाठी भावनिक विषय आहे. पण या स्मृतीस्थळामुळे आपली अडचण होत असल्याची तक्रारवजा विनंती करणारं पत्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं मुंबई महानगर पालिकेला लिहिलं आहे. २६ ऑक्टोबर २०२१ रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं पाठवलेलं हे पत्र आता समोर आलं आहे. या पत्रामध्ये शिवाजी पार्कवरील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळामुळे संघाच्या शाखेला अडचण होत असल्याचं या पत्रात नमूद केलं आहे. तसेच, त्यासंदर्भात पत्रातून वेगळी मागणी देखील करण्यात आली आहे.

१९३६ पासून भरते संघाची शाखा!

शिवाजी पार्कवरील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मतीस्थळाला लागूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेसाठीची जागा आहे. संघाच्या दादरमधील विभागामार्फत पालिकेला पाठवलेल्या पत्रानुसार, १९३६ सालापासून संघाची शिवाजी पार्कवर शाखा भरते. १९६७ मध्ये पालिकेनं तिथला १७५५ चौरस मीटरचा भूखंड संघाच्या शाखेसाठी भाडेपट्टीवर दिला. २००७ पर्यंत या भूखंडाचं भाडं देखील शाखेमार्फत भरण्यात आलं. मात्र, २००७ पासून आत्तापर्यंत पालिककडे वारंवार मागणी करून देखील या भूभागाचं आरेखन करण्यात न आल्यामुळे त्याचं भाडं थकित असल्याचं पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

Buldhana, Minor Girl, sexually Tortured, Case Registered, female friend,
बुलढाणा : अल्पवयीन मुलीला डांबून दहा दिवस अत्याचार; मैत्रिणीनेच दिला दगा….
Best Bus Monthly Pass Rate Increase Mumbai
बेस्टचा पास महागला; पासधारकांच्या खिशाला कात्री
Sharad pawar on loksatta agralekh
“मी फक्त लोकसत्ताचा अग्रलेख वाचला”, अजित पवारांच्या ‘त्या’ पत्रावरून शरद पवारांचा खोचक टोला, काय लिहिलंय अग्रलेखात?
pune rural police, Saswad, Planting Opium, Onion Field, arrest, Kodit Village, crime news,
पुणे : सासवड परिसरात कांद्याच्या शेतीत अफूची लागवड

दरम्यान, या पत्रासोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दादरमधील विभागाने काही मागण्या देखील केल्या आहेत. यामध्ये पर्यायी जागेची मागणी करण्यात आली आहे. स्मृतीस्थळामुळे आता आरेखन करणं देखिल जिकीरीचं होईल, असं नमूद करण्यात आलं आहे.

संघाच्या मागण्या…

या पत्रामध्ये दोन प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये, “सदर जागेचं थकीत भूभाडं तातडीनं स्वीकारण्यात यावं” अशी पहिली मागणी नमूद करण्यात आली आहे. तर, “स्मृतीस्थळाची वाढती व्याप्ती लक्षात घेता सदर भूभागाऐवजी शिवाजी पार्क मैदानाजवळील नाना-नानी पार्कजवळील मोकळा पर्यायी भूखंड भाडेपट्ट्यावर जागेचे आरेखन करून देण्यात यावा” ही दुसरी मागणी करण्यात आली आहे.