scorecardresearch

“RSS ची रुग्णालयं फक्त हिंदूंसाठीच आहेत का?”; रतन टाटांच्या प्रश्नावर नितीन गडकरींनी दिलं होतं ‘हे’ उत्तर

गडकरी यांनी महाराष्ट्रातील शिवसेना-भाजपा सरकारमध्ये मंत्री असतानाचा एक किस्सा सांगितला.

Who gets the ministers in trouble Nitin Gadkari reply
(File Photo: PTI)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) धर्माच्या आधारावर भेदभाव करत नाही, असे मी एकदा उद्योगपती रतन टाटा यांना सांगितले होते, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी सांगितले.पुण्यातील सिंहगड परिसरात एका धर्मादाय रुग्णालयाचे उद्घाटन त्यांनी केलं.


यावेळी बोलताना त्यांनी महाराष्ट्रातील शिवसेना-भाजप सरकारमध्ये मंत्री असतानाचा एक किस्सा सांगितला. “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रमुख दिवंगत हेडगेवार यांच्या नावावर असलेल्या रुग्णालयाचे औरंगाबादमध्ये उद्घाटन करण्यात येत होते. तेव्हा मी राज्य सरकारमध्ये मंत्री होतो. RSSच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने रुग्णालयाचे उद्घाटन रतन टाटा यांच्या हस्ते व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली आणि मला मदत करण्यास सांगितले,” असं गडकरी म्हणाले.


त्यानंतर त्यांनी टाटाशी संपर्क साधला आणि देशातील गरिबांना कॅन्सरची सेवा पुरविण्यात टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या योगदानाचा दाखला देत हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यासाठी त्यांना तयार केलं, असं ते म्हणाले. “रुग्णालयात पोहोचल्यावर टाटा यांनी विचारलं की हे रुग्णालय फक्त हिंदू समाजातील लोकांसाठी आहे का? मी त्यांना विचारले, ‘तुम्हाला असं का वाटतं’. त्यांनी लगेच उत्तर दिले, ‘कारण ते आरएसएसचे आहे’.


गडकरी म्हणाले, “मी त्यांना सांगितलं की रुग्णालय सर्व समुदायांसाठी आहे आणि आरएसएसमध्ये अशी कोणतीही गोष्ट (धर्माच्या आधारावर भेदभाव) होत नाही.” त्यानंतर त्यांनी टाटा यांना अनेक गोष्टी समजावून सांगितल्या आणि नंतर ते खूप आनंदी झाले, असंही गडकरी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rss hospital only for hindus ratan tata asked nitin gadkari his reply vsk