हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव तालुक्यातील गोंडाळा येथील इयत्ता दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या रूपाली शिंदे या मुलीने आपल्या जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रमाच्या जोरावर कुस्ती सारख्या पुरुष प्रधान खेळातही नाव कमावलं आहे.

ग्रामीण भागातील व गरीब कुटुंबातील असलेल्या रूपाली शिंदे हिने वयाच्या दहाव्या वर्षी दंगल चित्रपट पाहून आणि त्यातून प्रेरणा घेत वडिलांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीपटू होण्याचे स्वप्न उराशी बाळगून अखंड मेहनतीला सुरुवात केली. गावोगावी भरणार्‍या यात्रांमधील कुस्तीच्या दंगली गाजवून रूपालीने राज्य पातळीपर्यंत मजल मारली आहे.

How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
Rejuvenation of water bodies Uran
वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी पाणवठे पुनर्जीवित
nagpur, couple, Kidnapped, Young Engineer girl, Inspired by Web Series, police arrested, accused, marathi news,
वेबसिरीज बघून आखला अपहरणाचा कट; तरुणीचे अपहरण, प्रेमीयुगुल…
two groups of bjp leaders clash during meeting
मिरा भाईंदर मधील भाजपच्या दोन गटात तुफान हाणामारी; मेहता विरुद्ध व्यास गटाचे मतभेद शिगेला

मोठमोठ्या शहरात लाखो रुपये शुल्क आकारून खेळाचे प्रशिक्षण दिले जाते. मात्र एवढे करूनही यशाची खात्री अत्यंत कमी असते. पण जिद्द, चिकाटी असेल तर छोट्या व दुर्गम भागात राहून देखील आणि कोणत्याही प्रकारचे अद्यावत प्रशिक्षण न घेता कुस्तीमध्ये राज्यस्तरीयपर्यंत मजल मारता येते. हे दुर्गम भागातील या मुलीने दाखवून दिले आहे.

आई-वडिलांना कामात मदत करून तिचा हा परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि स्वत:ला सिद्ध करण्यासाठी सुरू असलेला संघर्ष थक्क करणारा आहे. गावातील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक रामेश्वर चोपडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तिने तालुका, जिल्हास्तरीय, विभागीय पातळीनंतर आता राज्यस्तरापर्यंत मजल मारली असुन भारतीय सैन्यात जाऊन देशसेवा करण्याचं तिचं स्वप्न आहे. कुस्ती क्रीडा प्रकारात तिने मिळवलेल्या यशामुळे आणि तिच्या परिश्रमामुळे तिच्यावर सर्वचस्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

मला पदक जिंकून सैन्य दलात भरती व्हायचं आहे –

”मला कुस्ती खेळण्यास सुरुवात करून पाच वर्षे झाले आहे. मला कुस्ती शिकण्यासाठी माझे शिक्षक चोपडे सर यांनी मला शाळेतून देखील सहकार्य केलं. माझी परिस्थिती हालाखीची असून माझे आई-वडील शेती करतात आणि मला शिकवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परिस्थिती गरीब असल्याने मी घरीच कुस्तीचा सराव करते, यंदा मी राज्य पातळीपर्यंत गेले होते. मात्र पायाला दुखापत झाल्याने मला तिथून परत यावं लागलं. मला पदक जिंकून सैन्य दलात भरती व्हायचं आहे, हे माझं स्वप्न आहे.” असं रुपाली शिंदे म्हणाली आहे.

त्यानंतर मला जाणवलं की हिला खरोखरच कुस्ती खेळायची आहे –

तर, ”मैदानात कुस्ती सुरू असताना ही माझ्या सोबत होती. तिने १५-२० मिनिटं ती कुस्ती पाहीली आणि मला म्हणाली की मी कुस्ती खेळू शकते का? मी तिला म्हणालो तू खेळू शकतेस परंतु आपली परिस्थिती नाजूक आहे. त्यानंतर जानेवारी महिन्यात कोळसाडी यात्रेत देखील कुस्ती पाहायला मिळाली. ही माझ्या माघारी तिथे गेली आणि कुस्ती खेळून आली. त्यानंतर मला जाणवलं की हिला खरोखरच कुस्ती खेळायची आहे. नंतर ती गावोगावच्या यात्रांमध्ये मुलांबरोबर कुस्ती खेळू लागली. तिच्या शाळेतील रामेश्वर चोपडे यांनी तिला खूप प्रोत्साहन दिलं. तिला तालुक्यापासून राज्यस्तरापर्यंत पोहचवलं.” असं रुपाली शिंदे हिचे वडील सांगतात.