scorecardresearch

शरद पवार जातीचं राजकारण करतात; राज ठाकरेंच्या आरोपांवर रुपाली पाटील म्हणाल्या, “राष्ट्रवादीत जातीवाद…”

मशिदीवर भोंग्यांवरून राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्याला देखील रुपाली पाटील यांनी उत्तर दिलं.

मनसे प्रमुख राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यात राष्ट्रवादीवर केलेल्या टीकेवरून राष्ट्रवादीचे नेते प्रत्युत्तर देत आहेत. पूर्वी मनसेत असलेल्या आणि काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीत आलेल्या रुपाली ठोंबरे पाटील यांनीही राज ठाकरेंच्या भाषणावरून त्यांना काही प्रश्न विचारले आहेत. शिवाय शरद पवारांवर जातीपातीचं राजकारण करत असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला होता. यावरूनही रुपाली ठोंबरे पाटील यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय.

“राज ठाकरे फायरबँड नेते, पण ईडी…”; रुपाली ठोंबरे पाटलांचा राज ठाकरेंना टोला

“राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीवर आणि शरद पवारांवर जे आरोप केले त्यात कोणतंही तथ्य नाही. राष्ट्रवादीत कोणताही जातीवाद नाही. हा पक्ष जातीपातीचं राजकारण करत नाही, हे पक्षाच्या नेत्यांवरून आणि आतापर्यंत जे मंत्री झालेत, त्यावरून दिसून येतं,” असं रुपाली ठोंबरे पाटील मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना म्हणाल्या.  

“तडीपार असलेले अमित शाह गृहमंत्री झाले तर…”; राज ठाकरेंना रुपाली ठोंबरे पाटलांचं प्रत्युत्तर

दरम्यान, मशिदीवरील भोंग्यांबाबत बोलताना रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या, “मला तुम्हाला आठवण करून द्यायची आहे की सुप्रीम कोर्टाने सार्वजनिक ठिकाणी भोंगे लावता येणार नाही, असा आदेश दिला होता. त्या आदेशाची अंमलबजावणी नक्कीच झाली पाहिजे. पण सुप्रीम कोर्टाने हा निर्णय राज्यात भाजपाची सत्ता असताना म्हणजेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना दिला होता. त्यावेळी त्या निर्णयाची अंमलबजावणी का करण्यात आली नाही. आता ते हा मुद्दा काढत असतील तर जाणीवपूर्वक ते या सगळ्या गोष्टी करत आहेत, हे सिद्ध होतंय. तसेच हिंदुंना हनुमान चालिसा किंवा भोंगे वाजवायला कोणीही नाही म्हटलेलं नाही. परंतु कायद्याने गुन्हा आहे तो आहे, मग तो कोणीही केला असूदेत, त्याला कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागतं,” असं त्यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rupali thombare patil replied to raj thackeray over caste based politics allegations on sharad pawar hrc