ग्रामसेवकासह शिपायास लाच घेताना अटक

घरकुल बांधण्यासाठी शासनाकडून मंजूर झालेल्या निधीचे वाटप करण्यासाठी तक्रारकर्त्यांकडून १८०० रुपयांची लाच स्वीकारताना जळगावच्या भडगाव तालुक्यातील मलगावचे ग्रामसेवक हिरामण सुपडू पाटील आणि शिपाई गणेश सुकदेव सोनार यांस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी अटक केली.

घरकुल बांधण्यासाठी शासनाकडून मंजूर झालेल्या निधीचे वाटप करण्यासाठी तक्रारकर्त्यांकडून १८०० रुपयांची लाच स्वीकारताना जळगावच्या भडगाव तालुक्यातील मलगावचे ग्रामसेवक हिरामण सुपडू पाटील आणि शिपाई गणेश सुकदेव सोनार यांस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी अटक केली. इंदिरा आवास योजनेंतर्गत घरकुल बांधण्यासाठी शासनाकडून ६८ हजार रुपये मंजूर झाले आहेत. मंजूर निधीपैकी २५ हजार रुपयांचा पहिला हप्ता मिळाला होता. दुसरा २५ हजार रुपयांच्या निधीचा धनादेश देण्यासाठी मलगाव ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामसेवक हिरामण पाटील यांनी तक्रारकर्त्यांकडे दोन हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीनंतर १८०० रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार मंगळवारी दुपारी बारा वाजता ग्रामपंचायत कार्यालयात तक्रारकर्त्यांकडून हिरामण पाटील यांच्या वतीने शिपाई गणेश सोनार यास लाच घेताना लाचलुपचत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rural civil servant arrested while taking bribe

ताज्या बातम्या