सावंतवाडी  : मराठी भाषा आणि शिक्षणाचा आस्वाद रशियन विद्यार्थी तालुक्यातील आजगाव शाळेत घेत आहे.  मिरॉन नावाचा केवळ अकरा वर्षांचा रशियन मुलगा आई झ्र् वडिलांबरोबर भारत फिरण्यासाठी आला. परंतु सध्या भ्रमंतीऐवजी सिंधुदुर्गमधल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत रमला आहे. मिरॉन भारत झ्र् रशिया घट्ट मैत्रीची प्रचीती छोटा दूत बनून देतो आहे.

सिंधुदुर्गमधल्या आजगाव गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत सध्या गावातील मुलांबरोबरच एक परदेशी चिमुकला अध्ययन करतोय. मिरॉन नावाचा अकरा वर्षांचा मुलगा सहा महिन्यासाठी आई-वडिलांबरोबर पर्यटक म्हणून रशियाहून आला. आई-वडिलांबरोबर पर्यटक म्हणून फिरताना आजगावच्या या शाळेने मात्र त्याला आकर्षित केले आणि त्याने आई-वडिलांकडे शाळेत प्रवेश करून देण्याचा हट्ट धरला. आता गेला महिनाभर मिरॉन येथील मुलांबरोबर चक्क मराठीमध्ये शिक्षण घेतो आहे.

Bhavesh Bhandari and his wife Jinal
Video: रथातून मिरवणूक, मौल्यवान वस्तू फेकल्या; जैन भिक्षूक होण्यासाठी २०० कोटी केले दान
A case has been registered against a minor in connection with the death of a student in a municipal school
महापालिका शाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणी अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल
gudi padwa in Nagpur
नागपुरात गुढीपाडव्याला सुमारे १५० बालकांचा जन्म, मुलींचा टक्का अधिक
34 Year Old Marries 80 Year Old Reel Star
८० वर्षांच्या रीलस्टारच्या प्रेमात महाराष्ट्रातील ३४ वर्षीय शीला झाली ‘दिवानी’; लग्नासाठी पार केले ६०० किमी अन् आता..

वर्गातील मित्रांबरोबर खेळांमध्ये आणि कवायतींमध्ये रमतो आहे. विशेष म्हणजे मित्रांबरोबर संवाद साधताना भाषेचा कोणताही अडसर त्याला जाणवत नाही . मराठीतले काही शब्द तसेच अंक तो लिहिण्या बोलण्यासाठी शिकला आहे. येथील भाषा, संस्कृती, खाद्यपदार्थ यावर तो प्रेम करू लागला आहे. त्याचा आवडता खाद्यपदार्थ वडापाव आहे. शाळेतली प्रार्थना देखील त्याने पाठ केली आहे. शाळांमध्ये दिला जाणारा पोषण आहारसुद्धा तो आवडीने खातो. महत्त्वाचे म्हणजे मिरॉनने स्वत:ला पाहुणा विद्यार्थी म्हणून कोणतीही विशेष वागणूक न देण्याची विनंती शिक्षकांना केली आहे . शाळेतील सर्व शिक्षकसुद्धा त्याच्या समरसतेचे कौतुक करतात आणि त्याला आवडीने शिकवतात.

चार महिन्यांनंतर त्याला रशियात परत जावे लागणार आहे परंतु पुन्हा संधी मिळाली तर मी नक्कीच परत येईन, असा विश्वास देखील तो व्यक्त करतो आहे. त्याची भारतीय भाषा शिकण्याची आवड बघून त्याला जिल्हा परिषद शाळेत त्याला तात्पुरता प्रवेश देण्यात आला आहे. भारतीय शिक्षण धोरणानुसार प्रत्येक मुलाला शिक्षणाचा अधिकार देण्यात आला आहे आणि याचे पालन ही जिल्हा परिषद शाळा करत आहे. भारतीय समाज जीवनाशी एकरूप झालेला मिरॉन खऱ्या अर्थाने भारत -रशिया मैत्रीचा छोटा दूत आहे.