कॉक्रोज जनता पार्टीचे संस्थापक, “अभिजीत दिपके गद्दार आहेत, दलितविरोधी आहेत,” अशी टीका आरपीआय गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी केली आहे. “दिपके , केजरीवाल यांच्या विचारधारेचे पिल्लू आहे,” असेही खरात म्हणाले. खरात यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही टीका केली. “राज ठाकरे जातीयवादी आहेत. मराठवाडा विद्यापीठ नामांतराला देखील त्यांच्याकडून विरोध झाला होता,” असे खरात सोलापूरमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
दिपकेंवर टीका
“अभिजीत दिपके आयआयटी मुंबईतील साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणावर मूग गिळून शांत बसले आहेत. दिपके दलित आहेत तर का शांत बसले आहेत?”, असा सवाल खरात यांनी माध्यमांशी बोलताना केला. “दिपके समाजाला मागे वळून पाहत नाहीत, ते गद्दार आहेत, दलितविरोधी आहेत, ते ‘आप’साठी काम करत होते आणि नंतर कामाच्या शोधात बाहेर गेले,” अशी टीका खरतांनी केली. “दलित समाजावर अन्याय होतात ते त्यांना दिसत नाहीत का?”, असा सवालही खरातांनी केला.
दिपके केजरीवालांचे पिल्लू – खरात
दिपके नाटकी असल्याची टीका खरातांनी केली. “दलित मुलगा गेला पण, त्यांना ज्ञानेश कुमारांचे पडलेले आहे. पार्टी काढून काय सत्तेत येणार आहे का?,” असेही खरात म्हणाले. “दिपके अरविंद केजरीवाल यांच्या विचारधारेचे पिल्लू आहे. तसेच, नीट आंदोलन सोनम वांगचुक यांच्यामुळे यशस्वी झाले हे देखील त्यांनी लक्षात ठेवावे,” असे खरात म्हणाले.
राज ठाकरेंवर टीका
आयआयटी आत्महत्या प्रकरणावरुन राज ठाकरे यांनी केलेल्या पोस्टचा खरात यांनी संदर्भ दिला. “राज ठाकरे या प्रकरणात जात आणू नये असे सांगतात. पण, सूर्यकुमार डुल्ला याने जातीयवादी टिप्पणी केल्याचे त्यांना दिसत नाही का?”, असा सवाल खरातांनी केली. “मराठी-अमराठी करणाऱ्या राज ठाकरेंनी डुल्ला उत्तर भारतीय असल्याचे दिसत नाही का? राज ठाकरे जातीयवादी आहेत,” असे खरात म्हणाले.
मराठवाडा नामांतराचा मुद्दा
जातीयवाद राज ठाकरे यांच्यापासून सुरु झाल्याचा आरोपही खरातांनी राज ठाकरेंवर केला. मराठवाडा विद्यापीठाला विरोध केल्याचेही खरात यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या वक्तव्याचा संदर्भ देत खरात म्हणाले. “शिवसेनेला मुंबईत पहिल्यांदा महापौरपद मिळाले त्यावेळी सुधीर जोशी महापौर झाले. १९९५ ला सत्ता आल्यानंतर मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. मग महाराष्ट्रात जातीयवाद सुरु कोणी केला?,” असा सवाल खरांतांनी उपस्थित केला. “आयआयटी आत्महत्या प्रकरणात आंदोलन का करत नाही?”, असेही खरात म्हणाले.
