‘...यामुळेच सातत्याने अशा घटना घडत आहेत’; वंदे भारत एक्स्प्रेसच्या अपघातांवरून सचिन सावंतांची भाजपावर टीका | Sachin Sawant criticizes BJP over Vande Bharat Express accidents msr 87 | Loksatta

‘…यामुळेच सातत्याने अशा घटना घडत आहेत’; वंदे भारत एक्स्प्रेसच्या अपघातांवरून सचिन सावंतांची भाजपावर टीका

जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत; गौमातेचा उल्लेख करत साधला आहे निशाणा

‘…यामुळेच सातत्याने अशा घटना घडत आहेत’; वंदे भारत एक्स्प्रेसच्या अपघातांवरून सचिन सावंतांची भाजपावर टीका
वंदभारत ट्रेनला अपघात होण्याची ही पाचवी वेळ आहे.

गुजरातमधील गांधीनगर ते मुंबई या मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला पुन्हा एकदा अपघात घडला आहे. हे पहिल्यांदा नाहीतर पाचव्यांदा घडले आहे. वंदे भारत एक्स्प्रेसच्या समोर जनावरे येऊन पुन्हा एकदा दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या घटनेवरून जोरदार चर्चा सुरू आहे. तर काँग्रेसकडून मोदी सरकारवर निशाणा साधला जात आहे.

वंदे भारत एक्स्प्रेसच्या अशा प्रकारच्या अपघाताची ही पाचवी वेळ आहे. या अपघातात वंदे भारत एक्स्प्रेच्या समोरच्या काही भागाचे नुकसान झाले आहे. या अपघातामुळे रेल्वे काही वेळासाठी थांबवण्यात आली होती. तर सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. मात्र या अगोदर घडलेल्या अशाचप्रकारच्या दुर्घटनेत काही जनावरांचा मृत्यू झाला होता.

वंदे भारत एक्स्प्रेसच्या या सततच्या दुर्घटनांवरून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपावर निशाणा साधल आहे. ‘देशाच्या बाकी राज्यांमध्ये भाजपासाठी गाय मम्मी आणि गोवा, अरुणाचलमध्ये भाजपासाठी गौमाता यम्मी. गौमातेच्या नावावर भाजपा करत असलेल्या राजकारणामुळे कदाचित गौमाता दुखावली आहे, यामुळेच सातत्याने अशा घटना घडत आहेत.’ असं सचिन सावंत म्हणाले आहेत.

याआधी वटवा ते मनीनगर दरम्यान अपघात –

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतर १ ऑक्टोबरपासून ही रेल्वे प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली होती. सेवेत दाखल झाल्यानंतर अवघ्या सहाव्याच दिवशी ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ला अपघात घडला होता. ६ ऑक्टोबर रोजी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास वटवा ते मनीनगर दरम्यान हा अपघात घडला होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 14:31 IST
Next Story
उदयनराजेंच्या राज्यपालांविरोधातील भूमिकेचे संजय गायकवाडांकडून समर्थन; म्हणाले, “शिवरायांबाबतच्या वक्तव्यांमुळे…”