दिगंबर शिंदे

सांगली :  रयत क्रांती संघटनेचे संस्थापक माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना विधान परिषदेसाठी भाजपने दिलेली संधी राखीव खेळाडूसारखीच ठरली. खोत यांना भाजपने दिलेली विश्रांती भाजपच्या पथ्यावर पडते की खोत यांना रयत क्रांती संघटनेची पाळेमुळे अधिक आक्रमकपणे रुजण्यासाठी उपयुक्त ठरते हे लवकरच लक्षात येईल. 

shekhar charegaonkar fraud marathi news
राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला, गुंतवणूकदारांची फसवणूक
cm eknath shinde participated in union minister nitin gadkari s campaign in nagpur
राज्य सरकारची कामे जनतेपुढे मांडा! एकनाथ शिंदे यांच्या पक्षनेत्यांना सूचना, प्रत्येक विभागाकडून दोन वर्षांतील कामाची यादी मागवली
Leaders of India will have a power show tomorrow and organize a meeting at Ramlila ground in Delhi
‘इंडिया’च्या नेत्यांचे उद्या शक्तिप्रदर्शन, दिल्लीत रामलीला मैदानावर सभेचे आयोजन; विरोधकांच्या एकजुटीला बळ
Suresh Khade
सांगली : आंदोलनकर्त्या कामगारांना मंत्र्यांच्या मध्यस्थीने २०० कोटींची भरपाई

विधान परिषदेसाठी भाजपच्या राष्ट्रीय पातळीवरून जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये खोत यांचे नाव नव्हते. मात्र, एकीकडे राज्यसभा निवडणुकीची रणनीती  आखली जात  असताना अखेरच्या रात्री खोत यांना अपक्ष उमेदवारी दाखल करून भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून राज्यातील नेत्यांनी जाहीर केले. मात्र, अखेरच्या क्षणी उमेदवारी मागे घ्यायला सांगून अपेक्षाभंग तर केला आहेच, पण आयात नेतृत्वाला संधी देत असताना यापुढे गांभीर्याने विचार केला जात असल्याचे संकेत  या निमित्ताने पक्षाने दिले आहेत हेच अधोरेखित होते. पश्चिम  महाराष्ट्रातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून ऊस दराच्या आंदोलनातून आक्रमक चेहरा म्हणून खोत यांचे नेतृत्व पुढे आले. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपने मित्रांची साथ मिळवत असताना  काँग्रेस, राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातील राजू शेट्टी यांच्याशी मैत्री केली. या मैत्रीतून देशाची सत्तासूत्रे भाजपच्या हाती आली. मोदी लाटेत राज्यातील सत्तासूत्रेही  भाजपने युतीच्या माध्यमातून हस्तगत  केली.

सत्तेत वाटा देण्यासाठी खोत यांना स्वाभिमानीच्या माध्यमातून आमदारकीची संधी मिळाली. मात्र, आमदार होताच, शेतकरी आंदोलनामध्ये सर्जा-राजा अशी ओळख असलेल्या जोडगोळीमध्ये म्हणजेच शेट्टी-खोत यांच्यात दुही निर्माण झाली. माजी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकट गेल्याने खोत  यांना राज्यमंत्रीपदही मिळाले. यानंतर मात्र, संघटनेची शिस्त  मोडली या कारणावरून स्वाभिमानी संघटनेतून खोत  यांची हकालपट्टी करण्यात आली.  स्वाभिमानीतून बडतर्फ केल्यानंतर खोत यांनी कृष्णाकाठी असलेला ऊस बागायतदार पुन्हा शेट्टी यांच्या चळवळीकडे वळू नये यासाठी रयत क्रांती संघटनेची स्थापना केली असली तरी त्यांच्या या संघटनेने फारसे  बाळसेच धरले नाही. दरम्यानच्या काळात खोत यांना भाजप फारच महत्त्व देत असल्यामुळे शेट्टी यांनीही  भाजपशी असलेले नातेसंबंध तोडून राष्ट्रवादीशी जवळीक केली. मात्र, ही  जवळीक शेट्टींना महागात पडली. हातकणंगले मतदार संघातून त्यांचा पराभव  झाला.

आक्रमक कार्यकर्ता

  • रस्त्यावरची लढाई करण्यास सदैव पुढे राहण्याची मानसिकता, व्यासपीठावर बोलत असताना तोंडी असलेली सामान्य जनतेच्या मनातील रांगडी भाषा ही  खोत यांची बलस्थाने आहेत. राज्यभर सामान्य जनतेचा आक्रमक चेहरा म्हणून असलेली ओळख भाजपला  हवी आहेच, याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात बोलणारा वक्ता भाजपला हवा आहे. आटपाडी तालुक्यातील आमदार गोपीचंद पडळकर यांच्या बरोबरीने राष्ट्रवादी  काँग्रेसवर शाब्दिक  वार करण्यात खोत हे पुढे असतात. याचाच  फायदा भाजपला  हवा आहे. या पुढील काळात तो मिळेल का याचे उत्तर येणारा काळच देईल. 
  • खोत यांचे मूळ गाव वाळवा तालुक्यातील मरळनाथपूर. राष्ट्रवादी काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या वाळवा तालुक्यात  विरोधकही खमक्या हवा ही भाजपची गरज आहे.यासाठी खोत यांचा वापर होतो की, तडजोडीचे राजकारण शिजते हे तोंडावर आलेल्या इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीत दिसणार आहे. मागील वेळी सर्व जयंत पाटील विरोधकांची मोट बांधण्यात खोतांनी पुढाकार घेतला होता, यावेळी ही जबाबदारी महाडिक  गटावर सोपवली जाते की,  अन्य कोणावर यावर भाजपची रणनीती स्पष्ट होणार आहे.