राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई महापालिकेच्या निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. तसंच ठाणे महापालिकेच्या निकालानंतर मुंब्रा येथे एमआयएमने जिंकलेल्या जागा लक्षवेधी ठरल्या. एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेवक सहर शेख यांनी केलेल्या भाषणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली. कैसा हराया म्हणत त्यांनी जितेंद्र आव्हाड यांची खिल्ली उडवली होती. हे भाषण चांगलंच व्हायरल झालं होतं. दरम्यान आता या भाषणाबाबत आणि सहर शेख यांच्या वक्तव्याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी नेमकं काय म्हटलं आहे?
सहर शेखच्या वक्तव्यावरही आव्हाड यांनी पलटवार केला. असे एखादी लहान पोरगी मिश्किलपणाने बोलते तर तिचं फार म्हणजे सोशल मीडियावरती तिच्या बालिशपणाची क्रेझ आहे, तिच्या त्या वक्तव्याला खूप काही अर्थ नाही. म्हणजे माझी लहान पोरगी हसत हसत म्हटली… चॉकलेट लाया.. तर तेही गाजेल त्यात काय विशेष नाही, असा पलटवार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं. तसेच, मुंब्रा तिरंगा है, हा देश तिरंगा आहे, हा महाराष्ट्र तिरंगा आहे आणि मुंब्रा तिरंगा आहे. संविधानाने तिरंगा रंग दिलाय, तुम्ही कुठल्याही एका रंगाची मोनोपली या देशात आणू शकत नाही असंही आव्हाड म्हणाले.
माझी लहान मुलगी हसत हसत म्हणाली तर ते पण व्हायरल होईल-आव्हाड
आजकाल गल्ली बोळात घोषणा देतात की कौन आया कौन आया शेर का शिकारी आया. नवीन पोरं कल्पक असतात, कल्पक पोरांच्या डोक्यातून आलेली ही कल्पना आहे असंही जितेंद्र आव्हाड त्यांच्या आगमनानंतर झालेल्या घोषणाबाजीवर म्हणाले. मला कुणाला काही सांगायला जात नाही. आव्हान दिलं तर दिलं ते त्यांचं काम करत असतात. आपण आपलं काम करत असतो. एखादी लहान मुलगी मिश्कीलपणाने बोलते, तिच्या वक्तव्याची क्रेझ बालिशपणाची आहे, तिच्या वक्तव्याला काही अर्थ नाही. माझी लहान मुलगी हसत हसत म्हणाली की चॉकलेट लाया तर ते पण सोशल मीडियावर गाजेल, त्यात काय मोठी नाही. जे काही झालं ते बालिश आहे असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.
सोशल मीडियावर सहर शेखची चर्चा
विजयानंतरच्या सभेत सहार शेख यांनी केलेलं भाषण चांगलंच चर्चेत आलं. त्यांनी थेट जितेंद्र आव्हाड यांना डिवचत, “आपण ताकदवान लोकांना झुंज दिली आणि त्यांना वाटत होतं की आपण निवडून येणार नाही. पण तुमच्या मदतीने या लोकांच्या अहंकाराच्या चिंधड्या उडवल्या. काहींना वाटत होतं आम्ही त्यांचे गुलाम आहोत, पण आमच्यासाठी फक्त अल्लाह सर्वोच्च आहे. आम्ही कोणाच्या बापाचे मिंधे नाही,” असा जोरदार हल्ला चढवला. पुढे बोलताना त्यांनी, “पाच वर्षांनी पुन्हा निवडणूक होईल, तेव्हा यापेक्षा मोठं प्रत्युत्तर द्यायचं आहे. संपूर्ण मुंब्रा हिरव्या रंगाने व्यापून टाकायचा आहे,” असं वक्तव्य केलं. तसेच नोटाला मिळालेल्या मतांचाही उल्लेख करत त्यांनी विरोधकांवर टीका केली.
