ठाणे महापालिकेत एमआयएमच्या ५ उमेदवारांचा विजय झाला आहे. यापैकी सहर शेख या तरुण नगरसेविकेचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये त्या स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड डिवचलं आहे. संपूर्ण मुंब्रा हिरवा करु असं आवाहन त्यांनी केलं आहे. सहर शेख यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या विधानाचे अनेकविध अर्थ लावले जात आहेत. मात्र, त्यावर त्यांनी आता स्पष्टीकरण दिलं आहे. त्या एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होत्या.
आमची लढाई कठीण होती, पण..
आमची लढाई कठीण होती, ताकदवान लोकांसमोर आम्हाला लढायचं होतं पण अल्लाहपेक्षा ताकदवान कुणी नाही. मुंब्रा या ठिकाणी तर आम्ही जिंकलोच पण महाराष्ट्रात आमचे १२५ नगरसेवक निवडून आलेत. त्यामुळे महाराष्ट्रही धक्क्यात आहे. आम्ही सेक्युलर आहोत, आम्हाला पायाभूत सुविधा, शाळा, रोजगार या विषयांवर काम करायचं आहे असं सहर शेख यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
मुंब्रा हिरवा करणार म्हणजे काय? याचा अर्थही उलगडला
संपूर्ण मुंब्रा हिरवा करुन टाकू याचा अर्थ काय हे विचारलं असता सहार शेख म्हणाल्या, “माझ्या पक्षाचा पक्षाचा म्हणजेच एमआयएमचा झेंडा हिरवा आहे. त्यामुळे मुंब्रा हिरवा करायचा आहे असं वक्तव्य केलं. माझ्या पक्षाचा झेंडा भगवा असता तर मुंब्रा भगवा करु असं मी म्हटलं असतं. इतकाच त्या विधानाचा अर्थ आहे.” सहर शेखने म्हटलं आहे कैसा हराया… असं म्हणत तिने जितेंद्र आव्हाडांना डिवचलं आहे. जे लोक समजत होते की आपण हरु, पण आम्हाला अल्लाहने आशीर्वाद दिला असंही सहर शेखने म्हटलं आहे. अहंकारी लोकांचा अहंकार तुम्ही ठेचून काढलात, त्याची लक्तरं केलीत असंही तिने म्हटलं आहे आणि जितेंद्र आव्हाड यांचं नाव न घेता टोलेबाजी केली आहे.
हिजाबवाली नगरसेविका म्हणून सहर शेख प्रसिद्ध झाली आहे
ठाणे महानगरपालिकेच्या वॉर्ड नंबर ३० मधून AIMIM ची तरूणी हिजाबवाली ही नगरसेविका म्हणून निवडून आली आहे. सहर शेख असे या नवनिर्वाचित नगरसेविकेचे नाव आहे. सहर शेखच्या भाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तरुण सहर शेख यांनी थेट जितेंद्र आव्हाडांना डिवचलं आहे. सहर शेखचे वडील युनुस शेख आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यातील वाद सर्वश्रृत आहेत. लेकीच्या विजयानंतल यूनुस शेख म्हणाले की, अल्लाहने ‘हिजाबवाल्या’ लेकीला देशात फेमस केलं आहे. वडील आणि मुलीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
