विदर्भ-मराठवाडा सीमेवरील सहस्रकुंड धबधबा ‘ओव्हरफ्लो’ 

प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी ३ कोटी ९० लाख रुपये खर्च झाले आहे.

अप्रतीम नसíगक सौंदर्याचे वरदान

तीन दिवसांपासून जिल्ह्य़ात सर्वत्र अविश्रांत कोसळत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असले, काही ठिकाणी मार्ग ठप्प झाले असले तरी पर्यटनाची आवड असणाऱ्यांसाठी मात्र यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्य़ाच्या सीमेवरील महाराष्ट्रातील प्रसिध्द सहस्रकुंड धबधबा सध्या कमालीच्या आकर्षणाचा विषय झाला आहे.

वरुणराजाची कृपा होऊन धो धो बरसणाऱ्या पावसाने सहस्रकुंड धबधबा ओव्हरफ्लो होऊन वाहत आहे, त्यामुळे भरपावसातही निसर्गाचा आनंद लुटणाऱ्या  पर्यटकांची ‘पाऊले चालती सहस्रकुंडची वाट..’ असे चित्र आहे.

विदर्भ-मराठवाडय़ाच्या सीमेवर यवतमाळपासुन १८० किलोमीटरवर पनगंगा अभयारण्यात असलेल्या सहस्रकुंडची पावसाळ्यातील मजा लुटण्यासाठी लहान मुलेमुली पालकांना गळ घालून सहस्रकुंडच्या नसíगक सौदर्याची मौज लुटण्याचा हट्ट धरून आहेत. यंदा मृगनक्षत्रापासून पावसाने थोडी उशिरा हजेरी लावली असली तरी ती दमदार आहे. दोन दिवसांपासून धो धो कोसळत असलेल्या पावसाने पनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. परिणामत सहस्रकुंडच्या जलधारा २०० फूट उंचावरुन आदळतांना होणारा खळखळाट ऐकण्याची आणि जलधारा पाहण्याची मजा काहीच औरच आहे. उमरखेड ते सहस्रकुंड हा ४५ किलोमीटरचा अत्यंत खराब आणि खड्डेच खड्डे असलेला रस्ता दुरुस्त करण्याची मागणी अनेक वर्षांंपासून होत आहे.

सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्प

विदर्भ-मराठवाडय़ाच्या सीमेवरील पनगंगा नदीवर प्रस्तावित सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला येत्या महिनाभरात मान्यता दिली जाईल, असे आश्वासन तत्कालीन जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी २०१३ मध्ये दिले होते. उमरखेडचे कॉंग्रेस माजी आमदार विजय खडसे यांनी विधानसभेत हा प्रश्न लावून धरला होता. तेव्हा मंत्र्यांनी हे आश्वासन दिले होते. प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी ३ कोटी ९० लाख रुपये खर्च झाले आहे. या प्रकल्पाला १२ गावाच्या लोकांनी विरोध केल्याने प्रकल्पात संशोधित आरखडा तयार करण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षांत प्रकल्पाची गती काय आहे, हे मात्र समजले नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sahastrakund waterfall overflow

Next Story
आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांना “संगणक साक्षर” करण्याची योजना बारगळली
ताज्या बातम्या