“एकाच गल्लीतला कार्यक्रम…”; साहित्य संमेलनातल्या ‘त्या’ कार्यक्रमावर सोशल मीडियावरुन टीका

एकाच गल्लीतील कार्यक्रम, एका विशिष्ट जातीची कंपूगिरी आहे, जातवार संमेलन असंही या मैफिलीबद्दल बोललं जात आहे.

नाशिक येथे आयोजित साहित्य संमेलन सुरु होण्याआधीच त्याच्यावर टीका होण्यास सुरुवात झाली आहे. या टीकेचं कारण आहे प्रसिद्ध कवी संदीप खरे आणि गीत-संगीतकार सलील कुलकर्णी यांची मैफिल. माझे जीवीची आवडी हा कार्यक्रम साहित्य संमेलनात सादर केला जाणार असून याच्यावरुन सोशल माीडियावर मोठ्या प्रमाणात टीकाटिप्पणी सुरू झाली आहे.

काय आहे हा कार्यक्रम?

नाशिकचे साहित्य संमेलन ३ ते ५ डिसेंबर दरम्यान आहे. मात्र, ग्रंथदिंडीच्या पूर्वसंध्येला २ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ ते रात्री ९ या वेळात डॉ. सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांचा ‘माझे जीवीची आवडी’ हा सांस्कृतिक कार्यक्रम होत आहे. विनोद राठोड हे कार्यक्रम समन्वयक आहेत. या कार्यक्रमात संत रचनांपासून ते स्वातंत्र्यवीर सावकरकर, भा. रा. तांबे, कुसुमाग्रज, बोरकर, आरती प्रभू, ग्रेस, शंकर वैद्य, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, शांताबाई शेळके, वसंत बापट या मान्यवरांचा प्रवास गीत तसंच काव्यातून उलगडला जाणार आहे.

काय आहे टीकेचं कारण?

या मैफलीचे सादरकर्ते आहेत कवी संदीप खरे आणि सगींतकार सलील कुलकर्णी. सोबतच ह्रषिकेश रानडे, विभावरी आपटे-जोशी, शरयू दाते, शुभंकर कुलकर्णी हे गायक आहेत. तर चिन्मयी सुमित आण विभावरी देशपांडे या काव्यवाचन करणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांचे आहे. या कार्यक्रमाला वादक म्हणून आदित्य आठल्ये, रितेश ओहोळ, सत्यजित प्रभू, राजेंद्र दूरकर आणि अमर ओक यांची साथसंगत राहणार आहे. या मैफलीतील बहुतांश कलाकार एकाच जातीचे असल्याने ही गल्लीतली मैफिल असल्याची टीका सोशल मीडियावरुन केली जात आहे.

एकाच गल्लीतील कार्यक्रम, एका विशिष्ट जातीची कंपूगिरी आहे, जातवार संमेलन असंही या मैफिलीबद्दल बोललं जात आहे. तसंच गल्ली बाहेर कला-साहित्य वगैरे असे काही असते तरी का? उगाच आपलं काहीतरी? जगणं हाच एक लढा दररोज असतो. त्यांना कला-साहित्य कसं सुचेल? त्यांच्या जगण्यावर पोट भरलेले मध्यमवर्गीय लोक कविता करतात. मग उच्च मध्यमवर्गीय तिकीट काढून दमलेला बाबा ऐकतात, अशाही टीप्पण्याही काही जणांनी केल्या आहेत. त्यासोबतच ही मैफिल अनेक मीम्सचा विषयही होताना दिसत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sahitya sammelan nashik programme by sandeep khare saleel kulkarni trolled vsk

ताज्या बातम्या