scorecardresearch

Premium

“मी ज्या दिवशी सरकारमध्ये येईन…”, मराठा आरक्षणासाठीच्या सर्वपक्षीय बैठकीनंतर संभाजीराजेंचं वक्तव्य

सर्वपक्षीय बैठकीनंतर संभाजीराजे छत्रपती म्हणाले, कायद्याच्या चौकटीत बसेल असं आरक्षण या सरकारने मराठा समाजाला द्यायला हवं.

sambhajiraje chhatrapati
मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाची मागणी करत दोन आठवड्यांपासून उपोषणाला बसले आहेत. जरांगे पाटलांच्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. तर आरक्षणाच्या विषयावरून विरोधकांकडून राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीला विविध मराठा संघटना, नेते आणि मराठा समाजाचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती हेदेखील या बैठकीला उपस्थित होते. बैठक अर्ध्यात सोडून संभाजीराजे बाहेर पडले. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी बातचीत केली.

यावेळी संभाजीराजे छत्रपती यांना प्रश्न विचारण्यात आला की सगळेच राजकीय पक्ष म्हणत आहेत की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण द्यावं लागणार आहे, परंतु यावर आता मार्ग कसा काढणार? या प्रश्नावर संभाजीराजे छत्रपती म्हणाले, केंद्रात आणि राज्यात त्यांचं सरकार आहे. जर मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास सिद्ध होत असेल तर तुम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ शकता.

Chandrakant Patil should resign as minister sakal Maratha community demand in Kolhapur
चंद्रकांत पाटील यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा; कोल्हापुरात सकल मराठा समाजाची मागणी
Student organizations protest against Governor Arif Mohammad Khan in Kerala
केरळच्या राज्यपालांचे रस्त्यावरच दोन तास ठाण; ‘एसएफआय’च्या निदर्शनांनंतर केंद्राकडून झेड सुरक्षा
Ajit Pawar on Jarange
मराठा आरक्षणाबाबत अधिसूचना निघाल्यानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “काल रात्रीपर्यंत…”
celebration in Satara
सातारा : राज्य सरकारच्या निर्णयानंतर साताऱ्यात जल्लोष

संभाजीराजे छत्रपती म्हणाले, कसंही करून तुम्ही आरक्षण देऊ शकता. मी सरकारमध्ये नाही ना, मी ज्या दिवशी सरकारमध्ये येईन तेव्हा आपण करू, काहीच अडचण नाही. परंतु सध्या मनोज जरांगे पाटलांचा विषय ऐरणीवर आहे. जरांगे यांनी तज्ज्ञांचं पथक मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पाठवलं होतं. त्यांच्याशी जी चर्चा झाली, त्या चर्चेतून काय निष्पन्न झालं ते या सरकारने स्पष्ट करावं. मराठा आरक्षण न्यायिक चौकटीत बसू शकतं असं त्यांच्या तज्ज्ञांनी सांगितलं आहे. न्यायालयीन कसोटीत मराठा आरक्षण बसत असेल तर देऊन टाका. चौकटीत बसत नसेल तर नाही म्हणून सांगा.

हे ही वाचा >> “महाराष्ट्राचा मणिपूर करायचा नसेल तर…”, मराठा महासंघाचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा

संभाजीराजे म्हणाले, मराठा समाजाची फसवणूक करू नका. याआधी ४९ मराठा तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्या आपल्याला परवडणाऱ्या नाहीत. मी त्यांचं समर्थन करत नाही. त्यामुळे सरकारने योग्य निर्णय घ्यावा.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sambhaji raje chhatrapati says when i come to the government will give maratha reservation asc

First published on: 11-09-2023 at 21:10 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×