गेल्या काही वर्षांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा पाठपुरावा करणाऱ्या संभाजीराजे भोसले यांनी आज दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मोठा निर्णय जाहीर केला आहे. संभाजीराजे भोसले यांनी सातत्याने राज्य सरकार, विरोधी पक्ष यांच्याशी मराठा आरक्षणाबाबतच्या मागण्यांसाठी पाठपुरावा केला आहे. राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या आश्वासनांनी देखील त्यांचं समाधान न झाल्यामुळे त्यांनी रकाज्य सरकारवर टीका देखील केली आहे. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे भोसले यांनी आजच्या पत्रकार परिषदेत मोठा निर्णय घेण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार त्यांनी आपल्या पुढील राजकीय वाटचालीसंदर्भात दोन मोठे निर्णय जाहीर केले आहेत.

राज्यसभा खासदारकीबाबत घेतला मोठा निर्णय

संभाजीराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत त्यांच्या राज्यसभेच्या खासदारकीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. “या वर्षीची राज्यसभेची निवडणूक मी नक्कीच लढवणार आहे. यावर्षीची निवडणूक मी अपक्ष म्हणून लढवणार आहे. राजकारण विरहीत, समाजाला दिशा देताना मी कधीही त्याचा फायदा कुणाला होईल हे न पाहाता समाजाचं हित पाहिलं. त्यामुळे माझा अधिकार बनतो की आपण अपक्ष म्हणून मला पाठिंबा देणं गरजेचं आहे. जे २९ अपक्ष आमदार आहेत, त्यांनी मोठं मन दाखवायला हवं. फक्त छत्रपतींचा वंशज म्हणून नाही, तर माझी कार्यपद्धती पाहून पाठिंबा द्यावा. मी तुम्हाला नक्कीच भेटून माझी बाजू समजावून सांगणार आहे. माझ्या कामाची दखल गेऊन तुम्ही मला राज्यसभेत पाठवावं अशी विनंती मी सर्वपक्षीय नेत्यांना करतो. मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. मी अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवणार आहे. मी आजपासून कोणत्याही पक्षाचा सदस्य नाही”, असं संभाजीराजे भोसले यावेळी पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत.

virendra mandlik criticizes shahu chhatrapati s family
छत्रपती कुटुंबाने राजर्षी शाहू महाराजांच्या नावाला साजेसे काम केले नाही; मंडलिक घराण्याची पुन्हा एकदा टीका
udayanraje bhosale, nomination, satara lok sabha 2024 election
मला उमेदवारी मिळणार हे निश्चित – उदयनराजे
Sanyogeetaraje Chhatrapati
कोल्हापूर जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाहू महाराज सक्षम उमदेवार – युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती
parbhani lok sabha marathi news, shivsena parbhani lok sabha marathi news, sanjay jadhav parbhani loksabha marathi news
पस्तीस वर्षात ‘धनुष्यबाण’ चिन्हाशिवाय बालेकिल्ल्यातील शिवसेनेची पहिलीच निवडणूक

स्वराज्य संघटनेची घोषणा!

आपल्या दुसऱ्या निर्णयामध्ये त्यांनी एका नव्या संघटनेची घोषणा केली आहे. “”मला वेगवेगळ्या संघटनांचे, पक्षांचे लोक पाठिंबा देतात. ही छत्रपती घराण्याची ताकद आहे. मला चांगले-वाईट अनुभव देखील आले. या जनतेला एका छताखाली कसं आणता येईल, हा माझा प्रामाणिक प्रयत्न नेहमीच राहिला आहे. त्यामुळे मी दुसरा निर्णय असा घेतला आहे की छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या विचारांना मानणाऱ्या सगळ्यांना संघटित करण्यासाठी, समाजाला दिशा देण्यासाठी, सगळ्यांच्या कल्याणासाठी मी आणि आम्ही सर्वजण एक संघटना स्थापन करणार आहोत. त्या संघटनेचं नाव आहे स्वराज्य. यासाठी मी याच महिन्यात राज्याचा दौरा करणार आहे. लोकांच्या भावना समजून घेण्यासाठी हा दौरा करणार आहे. आजपासून ही संघटना स्थापन झाली आहे”, असं संभाजीराजे भोसले यांनी जाहीर केलं आहे.

Maharashtra News Live: दिवसभरातील सर्व महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना हे लक्षात आल्यानंतर आत्ताचे पंतप्रधान मोदींच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मला बोलवून विनंती केली की आपण राष्ट्रपतीनियुक्त खासदार व्हावं. मी खासदार झालो त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मी पहिल्यांदा मोदीांना भेटलो, तेव्हा मी राजश्री शाहू महाराजांचं पुस्तक त्यांना दिलं होतं. त्यात मी माझा अभिप्राय लिहिला होता. मी छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या विचारांप्रमाणेच माझी वाटचाल असणार आहे. त्याप्रमाणेच ६ वर्षांत राजकारणविरहीत समाजाला दिशा देण्याच्या नियमाप्रमाणे मी चाललो.

“या काळात मी अनेक कामं केली. माझा कार्यकाळ समाजहिताच्या दृष्टीने होता. २००७ पासून २०२२ पर्यंत मी पूर्णपणे समाजासाठी वाहून घेतलंय. राजवाड्यात वैभव असूनही मी महिन्यातले ५-६ दिवसच जातो. पण लोकसेवा करायची असेल तर राजसत्ता देखील महत्त्वाची आहे. दोन निर्णय मी घेतले आहेत”, असं देखील ते म्हणाले.