Maratha Reservation: “गरीब मराठ्यांचं नुकसान होत असेल तर…”, संभाजीराजेंचा ठाकरे सरकारला अल्टिमेटम

आम्ही वेळोवेळी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं, मूक आंदोलन केलं. त्यातूनही काही निष्पन्न होत नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

राज्यातला मराठा आरक्षणाचा प्रश्न काही दिवस मागे पडला असला तरी आता तो पुन्हा एकदा उफाळून आला आहे. खासदार संभाजीराजे छत्रपतींनी आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी कंबर कसली आहे. मराठ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर लाँग मार्च काढण्याची घोषणाही संभाजीराजेंनी केली आहे.

छत्रपती संभाजीराजे आज जनसंवाद यात्रेनिमित्त सोलापूर जिल्हा दौऱ्यावर होते यावेळी मोहोळमध्ये पत्रकारांशी चर्चा करताना त्यांनी पुणे ते मुंबई लाँग मार्च काढणार असल्याचे सांगितल. ते म्हणाले, “लाँग मार्चची घोषणा केली असली तरी लाँग मार्च व्हावा अशी आमची इच्छा नाही. गेल्या सात- आठ महिन्यात आम्ही अनेकदा राज्य शासनासमोर आम्ही अनेक प्रश्न मांडले आहेत. आरक्षणाच्या बाबतीत असो किंवा इतर बाबतीत राज्याने व केंद्राने आपापली जबाबदारी पार पाडायला हवी”.

ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा.

संभाजीराजे पुढे म्हणाले, “आरक्षणाच्या व्यतिरिक्त ज्या मूलभूत सुविधा आहेत, त्याबद्दल आम्ही वेळोवेळी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं, मूक आंदोलन केलं. त्यातूनही काही निष्पन्न होत नाही. परवा त्यांनी आम्हाला एक पत्रही पाठवलं पण ते बोगस होतं. बोगस म्हणणं चुकीचं आहे. ते पत्र चुकीचं होतं कारण ते सरकारी बाबूंनी लिहिलेलं पत्र होतं. मी त्यांच्या पत्राला उत्तर दिलं की तुम्हाला चुकीचं कोणीतरी सांगितलं आहे. पण त्याला त्यांचं काही उत्तर आलेलं नाही. अशीच परिस्थिती असेल, गरीब मराठ्यांचं नुकसान होत असेल तर आम्हाला लाँग मार्च काढण्यावाचून पर्याय उरणार नाही”.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sambhajiraje maratha reservation long march thackeray government vsk

Next Story
‘कोरा कागद निळी शाई, आम्ही कोणाला भीत नाही’!