“क्रांतीच्या बहिणीवर केस दाखल झाली तेव्हा मी…”;मलिकांच्या दाव्यावर वानखेडेंचं स्पष्टीकरण

नवाब मलिकांनी ट्वीट करत क्रांती रेडकरच्या बहिणीवर पुण्यात ड्रग्जची केस नोंदवली असल्याचा दावा केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर सतत आरोप करणाऱ्या नवाब मलिक यांनी आता वानखेडेंची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकरवर निशाणा साधला आहे. क्रांती रेडकरच्या बहिणीवर पुण्यात ड्रग्जची केस नोंदवलेली आहे, पुण्यात ड्रग्जचं प्रकरण प्रलंबित असल्याचा दावा मलिक यांनी केला होता. समीर वानखेडेंनी या प्रकरणात उत्तर द्यावं, असंही नवाब मलिक म्हणाले होते. त्यावरच आता समीर वानखेडेंनी स्पष्टीकरण दिलं आहे.

नवाब मलिक यांना प्रत्युत्तर देताना वानखे़डे म्हणाले, क्रांतीची बहीण हर्षदा रेडकर यांच्यावरची केस ही २००८ सालची आहे. त्यावेळी मी नोकरीतही नव्हतो. तसंच क्रांतीशी माझं लग्न २०१७ साली झालं. मग माझा या प्रकरणाशी काही संबंध कसा असेल?

हेही वाचा – क्रांती रेडकरच्या बहिणीवर पुण्यात ड्रग्जची केस? नवाब मलिकांच्या नव्या ट्वीटने पुन्हा खळबळ

याबद्दल नवाब मलिक यांनी एक नवीन ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी काही स्क्रिनशॉट्सही जोडलेले आहेत. ट्वीटमध्ये मलिक म्हणतात, “समीर दाऊद वानखेडे, तुमची मेहुणी हर्षदा दिनानाथ रेडकर ही ड्रग्जच्या व्यवसायात सामील आहे की काय? तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल कारण तिच्याविरोधातली केस पुणे कोर्टात प्रलंबित आहे”. या ट्वीटसोबत त्यांनी या प्रकरणातले पुरावेही दिल्याचं सांगितलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sameer wankhede answer to nawab malik i was not even in service when harshada redkar case happened vsk