अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्र्ग्ज प्रकरणामध्ये रोज नवीन नवीन खुलासे आणि आरोप केले जात आहेत.  अमली पदार्थ प्रकरणातील पंचाने अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर लाच मागितल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली असतानाच दुसरीकडे आज राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे हे मुस्लिम असल्याचा पुरावा म्हणून त्याच्या जन्माचा दाखला ट्विटरवरुन शेअर करत या प्रकरणामध्ये आणखीन एक धक्कादायक आरोप केलाय.

वानखेडे यांनी मुस्लिम असल्याचं लपवून चुकीच्या पद्धतीने कागदपत्रांचा वापर करुन नोकरी मिळवल्याचा दावा मलिक यांनी केलाय. दरम्यान समीर वानखेडे यांनी हे आरोप फेटाळले असून आपण न्यायालयात उत्तर देऊन असं म्हटलं आहे. मात्र असं असतानाच आता या प्रकरणावरुन आमने-सामने आलेले वानखेडे आणि नवाब मलिक हे दूरचे नातेवाईक असल्याची माहिती समोर येत आहे. खुद्द नवाब मलिक यांनीच यासंदर्भातील माहिती दिलीय.

Former corporator Leena Garad suspended by BJP joins Thackeray groups Shiv Sena
भाजपच्या निलंबीत माजी नगरसेविकेचा ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश
Raj Thackeray meets Salman khan
Video: राज ठाकरेंनी घेतली सलमान खानची भेट; गोळीबार प्रकरणात हल्लेखोरांचे फोटो आले समोर
Sanjay Shirsat on Raj Thackeray GudhiPadva
राज ठाकरे आणि महायुतीमध्ये काय ठरलं? संजय शिरसाट म्हणाले, “यावेळी गुढीपाडवा मेळाव्यात…”
nagpur crime news, suspicion of character nagpur
प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला पाजले विष, पोलिसांनी…

नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंच्या पहिल्या लग्नातील रिसेप्शनचा एक फोटो ट्विट केला. २००६ साली विशेष विवाह कायदा १९५४ अंतर्गत नागरी विवाह समारंभात डॉ. शबाना कुरेशी यांच्याशी लग्न केले होते. २०१६ मध्ये विशेष विवाह कायद्याअंतर्गत समीर आणि शबाना या दोघांनी दिवाणी न्यायालयाद्वारे परस्पर घटस्फोट घेतला. २०१७ मध्ये समीर यांनी क्रांती रेडकरशी विवाह केला. याच पहिल्या विवाहचा फोटो नबाव मलिक यांनी पोस्ट करत पैचान कौन अशी कॅप्शन दिली होती.

मलिक म्हणाले, “आमची एक बहीण आहे…”
समीर वानखेडेंच्या पहिल्या पत्नीसंदर्भात एबीपी माझाशी बोलताना नवाब मलिक यांनी या अधिकाऱ्याने अनेकदा खोटारडेपणा केल्याचा आरोप केलाय. यावेळी मलिक यांना तुमचं वानखेडे यांच्या पहिल्या पत्नीशी काही बोलणं झालं का असं विचारण्यात आलं असता त्यांनी वानखेडे आणि ते दूरचे नातेवाईक असल्याचं काही लोकांकडून कळल्याचं सांगितलं. “काही लोकांनी माहिती दिली लांबून काहीतरी नात्यातील आमची एक बहीण आहे. त्यांची मुलगी ज्या घरात आहे. त्यांचं (वानखेडे कुटुंबाचं) त्या मुलीशी काहीतरी नातं आहे,” असं मलिक यांनी म्हटलं आहे.

वानखेडेंचं स्पष्टीकरण…
नवाब मलिक यांनी ट्वीटरवर समीर वानखेडे यांचा एक जुना फोटो शेअर केल्याने या प्रकरणाला वेगळं वळण लागल्यानंतर आता वानखेडेंनीही यावर स्पष्टीकरण दिलंय. मी सांगू इच्छितो की माझे वडील ज्ञानदेव कचरुजी वानखेडे ३० जून २००७ रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून निवृत्त झाले. माझे वडील हिंदू आणि माझी आई स्वर्गीय श्रीमती झहीदा मुस्लिम होत्या. मी भारतीय परंपरेतील एक संमिश्र, बहुधर्मीय आणि धर्मनिरपेक्ष कुटुंबातील आहे आणि मला माझ्या वारशाचा अभिमान आहे,” असं समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे.

“मी २००६ मध्ये विशेष विवाह कायदा १९५४ अंतर्गत नागरी विवाह समारंभात डॉ. शबाना कुरेशी यांच्याशी लग्न केले. २०१६ मध्ये विशेष विवाह कायद्याअंतर्गत आम्ही दोघांनी दिवाणी न्यायालयाद्वारे परस्पर घटस्फोट घेतला. २०१७ मध्ये मी क्रांती दीनानाथ रेडकर ह्यांच्याशी लग्न केले,” असं वानखेडे यांनी आपल्या वैवाहिक आयुष्याबद्दल बोलताना सांगितलं आहे.