कृषीमंत्री अब्दुल सत्तार जमीन घोटाळा, कृषीमहोत्सव यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. हिवाळी अधिवेशनात त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली जात आहे. या आरोपानंतर सत्तार यांनी स्वपक्षावरच नाराजी व्यक्त केली होती. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर आमची एक बैठक झाली होती. त्याची माहिती लगेच बाहेर कशी आली? असा सवाल अब्दुल सत्तार यांनी केला होता. दरम्यान, सत्तार यांच्या याच विधानावर आता शिंदे गटातील नेते तथा मंत्री संदिपान भुमरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते आज (१ जानेवारी) ‘एबीपी माझा’शी बोलत होते.

हेही वाचा >>>“संभाजीराजे धर्मवीर नव्हते म्हणायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?” संजय गायकवाडांचे अजित पवारांवर टीकास्र; म्हणाले, “दोन दिवसांपूर्वी…”

Nandurbar, Heena Gavit,
नंदुरबारमध्ये डॉ. हिना गावित यांच्यासमोर स्वपक्षीय, मित्रपक्षांच्या नाराजीचे आव्हान
Tamil Nadu news M. K. Stalin
तमिळनाडूत यंदा तिरंगी लढतीची शक्यता; द्रमुक, अण्णाद्रमुक अन् भाजपामध्ये सामना होणार
ramdas kadam shrikant shinde
“…तर मी राजकारणातून निवृत्त होईन”, ठाकरे गटाच्या ‘त्या’ टीकेवर रामदास कदमांचं प्रत्युत्तर; श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीबाबत म्हणाले…
maval lok sabha marathi news, shrirang barne marathi news
मित्र पक्षांच्या नेत्यांची नाराजी दूर करण्यावर श्रीरंग बारणे यांचा भर, गाठीभेटी सुरू

“सत्तार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत बसून चर्चा करायला हवी होती. कोणीही माध्यमांकडे जाऊन बोलू नये, अशी माझी सूचना आहे. अब्दुल सत्तार यांचा रोख कोणाकडे आहे, हे मी सांगू शकत नाही. मात्र ते मुख्यमंत्र्यांना भेटत असतात, त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे याबाबत बोललं पाहिजे,” असे भुमरे म्हणाले.

हेही वाचा >>> “…तर शिवसेना पुन्हा एकसंध व्हायला वेळ लागणार नाही,” उद्धव ठाकरेंना उद्देशून दीपक केसरकरांचे सूचक विधान

अब्दुल सत्तार काय म्हणाले होते?

“मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर आमची एक मीटिंग झाली होती. त्याची माहिती लगेच बाहेर कशी आली? आपले लोक लगेच बाहेर काढतात. असं नाही व्हायला पाहीजे. अंतर्गत चर्चा बाहेर नाही काढली पाहीजे. आमच्यातले कुणी काय करत असेल तर माहीत नाही. पत्रकारांनाच त्यांच्याकडून जास्त माहिती मिळते. राजकारणामध्ये राज करण्यासाठी काही कारणे शोधावी लागतात, तसे काहीजण शोधत आहेत. पण मी माझे काम करत राहिल”, अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी दिली.

हेही वाचा >>> ‘…तर आमदारांसह बेकायदा सरकार घरी गेलेलं दिसेल,’ नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी संजय राऊतांचा दावा

सत्तार यांनी केलेल्या विधानानंतर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. “अब्दुल सत्तार अनेकवेळा गमतीने बोलत असतात. त्यामुळे ते किती गंभीरतेने घ्यायचे हे मला माहीत नाही. काही झाले असेल तर निश्चितपणे त्यात लक्ष घातले जाईल. पण पक्षांतर्गत घडामोडी झाल्या असतील, तर त्याच्या चर्चा बाहेर करायच्या नसतात. या प्रकरणात मुख्यमंत्री आवश्यक तो निर्णय घेतील. पक्षांतर्गत बाबींची जाहीर चर्चा करण्याची पद्धत कुठल्याही पक्षात नसते. आमच्याही पक्षात तशी पद्धत नाही,” असे केसरकर म्हणाले.