Premium

“वर्षा बंगला सोडायचा होता तेव्हा..,” संदीपान भुमरेंची उद्धव ठाकरेंवर टीका, म्हणाले मुलगी सासरी…

शिवसेनेतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.

UDDHAV THACKERAY AND SANDIPAN BHUMRE AND VARSHA BUNGALOW
उद्धव ठाकरे आणि संदीपान भुमरे

शिवसेनेतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर या संघर्षाने टोकेचे स्वरुप धारण केले आहे. दोन्ही बाजूचे नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. असे असताना रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. करोना महासाथीच्या काळात ते घराबाहेर पडले नाहीत. वर्षा बंगला सोडताना एखादी मुलगी सासरी जात असल्याचे सोंग उद्धव ठाकरे यांनी केले, अशी खोचक टीका भुमरे यांनी केली. ‘टीव्ही ९ मराठी’ने याबाबतचे वृत्त दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> “तर मग आम्हालाही खरं सांगत…”, दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंना इशारा,आदित्य ठाकरेंनाही टोला!

उद्धव ठाकरे अडीच वर्षे ते कोणालाही दिसले नाहीत. आपण त्यांना फक्त टीव्हीमध्ये पाहात होतो. आम्हालाही टीव्ही सुरू केल्यानंतरच उद्धव ठाकरे दिसायचे. टीव्ही बंद केला की ते गायब व्हायचे. करोनाकाळात एवढे संकट आलेले होते. मात्र उद्धव ठाकरे एकाही जिल्ह्यात गेले नाहीत. आदित्य ठाकरे यांनीही एखाद्या ठिकाणाला भेट दिली नाही. मात्र आता त्यांना सगळीकडे जाण्यासाठी वेळ आहे, असे संदीपान भुमरे म्हणाले.

हेही वाचा >>> उद्योगपती मुकेश अंबानी आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठक, कोणत्या विषयावर झाली चर्चा?

मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवसस्थान असलेल्या वर्षा बंगल्यामधून उद्धव ठाकरे यांना बाहेर पडायचे होते. मात्र त्याच दिवशी त्यांना करोनाची लागण झाली. त्यांच्या तोंडाला आदल्या दिवशी मास्क होते. मात्र जेव्हा वर्षा बंगला सोडायचा होता, तेव्हा एखादी मुलगी सासरी जात असल्याचे त्यांनी सोंग घेतले. रडारड सुरू होती, अशी घणाघाती टीका संदीपान भुमरे यांनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sandipan bhumre criticizes uddhav thackeray on leaving varsha cm bungalow prd

First published on: 25-09-2022 at 11:05 IST
Next Story
‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चा भाजपालाच होतो फायदा – सचिन सावंतांचं विधान!