संगमनेर : विजयाच्या अतिआत्मविश्वासामुळे सर्वांना गृहीत धरणे, कार्यकर्त्यांनी निवडणूक गांभीर्याने न घेणे, विखे पिता – पुत्राची आक्रमक रणनीती, महायुतीचे हिंदुत्व आणि लाडकी बहीण या सगळ्याची एकत्रित परिणीती संगमनेरमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मानहानीकारक पराभवात झाली. तुलनेने अत्यंत नवख्या असलेला एका ‘सायबर कॅफे चालक’ तरुणाने शिंदे सेनेचा आमदार होत इतिहास घडवला. संगमनेरच्या जनतेने दिलेला हा निकाल राज्याला आश्चर्यचकित करून गेला.

पोस्टल मतदानाची फेरी सोडता मतदानाच्या प्रत्येक फेरीत घेतलेली आघाडी खताळ यांनी शेवटपर्यंत कायम ठेवली. २१ पैकी एकाही फेरी थोरात यांना आघाडी घेता आली नाही. खताळ यांना एक लाख १२ हजार ३८६, तर थोरात यांना एक लाख एक हजार ८२६ मते मिळाली. जायंट किलर ठरलेले खताळ १० हजार ५६० मतांनी विजयी झाले. पोस्टल मतदानामुळे थोरात यांना लाखाचा टप्पा गाठता आला.

Pankaja Munde Speech And Suresh Dhas Speech News
Politics : सुरेश धस देवेंद्र फडणवीस यांना म्हणाले ‘बाहुबली’; पंकजा मुंडे म्हणाल्या, “मी शिवगामी, मेरा वचनही है शासन”
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Maharashtra Growth Momentum Fadnavis Updates at NITI Aayog
राज्याच्या विकासाचा वेग कायम राखण्यासाठी आराखडा महत्वाचा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
beed politics Devendra Fadnavis Suresh Dhas pankaja munde dhananjay munde
माध्यमांमध्ये ‘ आवाज’ बनलेल्या सुरेश धस यांच्या पाठिशी देवेंद्र फडणवीस
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
Raj Thackeray should come to Sangamner to see why Balasaheb Thorat was defeated says MLA Amol Khatal
माजी मंत्री थोरात यांचा पराभव का झाला ते पाहण्यासाठी राज ठाकरेंनी संगमनेरात यावे – आमदार अमोल खताळ
Mukesh Ambani
Mukesh Ambani On AI : ChatGPT च्या वापराबाबत मुकेश अंबानींचा विद्यार्थ्यांना खास सल्ला; म्हणाले, “लक्षात ठेवा कृत्रिम बुद्धीने नव्हे…”
mathadi workers leader narendra patil express view on ajit pawar upset
थोरल्या पवारांचे आभार, अजितदादा मात्र नाराज;माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांचे अनुभव कथन

स्वतः थोरात राज्याच्या प्रचारात व्यस्त झाल्याने संगमनेरमध्ये त्यांना फारसा वेळ देता आला नाही. आपली निवडणूक कार्यकर्त्यांवरच सोपवली आहे, असे ते स्वतः सांगत होते. मात्र थोरात सहज विजयी होतील या फाजील आत्मविश्वासावर प्रमुख कार्यकर्ते अत्यंत गाफील राहिले. त्याचा एकत्रित परिणाम म्हणजे थोरात यांच्या प्रचार यंत्रणेत कमालीचा विस्कळीतपणा होता. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पुढे येत असताना त्यांचा स्वपक्षीय कार्यकर्त्यांनीच घात केला. निस्वार्थी कार्यकर्त्यांच्या जागी लाभार्थी, ठेकेदार कार्यकर्ते येऊन पदाधिकारीही झाले, हेही जनतेला रुचले नाही. कार्यकर्त्यांवर असलेल्या जनतेच्या रोषाचे धनी थोरात यांना व्हावे लागले. सलग आठ वेळा विजयी होण्याचा अनुभव गाठीशी असताना यावेळी जनमताचा अंदाज ना थोरात यांना आला, ना कोणी त्यांच्या लक्षात आणून दिला.

लोकसभेला नगर दक्षिण मतदार संघातून तत्कालीन खासदार सुजय विखे यांचा पराभव घडवून आणण्यात थोरात यांनी कळीची भूमिका बजावली होती. त्यामुळे दुखावलेल्या विखे परिवाराने थोरात यांना संगमनेरमध्ये खिंडीत गाठले. सुजय विखे यांनी संगमनेरमध्ये घेतलेल्या सभांनी चांगली वातावरण निर्मिती केली होती, त्याचा फायदा पुढे खताळ यांना झाला. विखेंच्या भक्कम पाठबळाच्या जोरावर खताळ यांनी प्रचाराच्या उत्तरार्धात आश्चर्यकारकरीत्या आव्हान उभे केले होते. सुजय विखे यांनी प्रचार यंत्रणा आपल्या हाती घेत अत्यंत आक्रमकपणे राबवली. हिंदुत्व आणि लाडकी बहीण योजना खताळ यांना सहाय्यकारी ठरल्याने मतदानाची टक्केवारी वाढली. या सगळ्याचा परिपाक थोरात यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचा पराभव होण्यात झाला.

हे ही वाचा… Maharashtra Assembly Election Results 2024 Live Updates: विधानसभा निकालावर राज ठाकरेंची दोन शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले…

वाढदिवसाची अविस्मरणीय भेट

खरी दडपशाही कुणाची होती हे मतदानातून सिद्ध झाले. लोकसभेला आम्हाला त्रास दिला त्याचे परिणाम संगमनेरसह पारनेरमध्येही दिसले. त्यांच्या जवळच्या कोंडाळ्यामुळेच त्यांचा पराभव झाला. आमच्या गनिमी काव्याच्या प्रचार तंत्राला यश आले. आज माझ्या वाढदिवसानिमित्त संगमनेरच्या जनतेने दिलेली ही आयुष्यभर लक्षात राहील अशी भेट आहे. – सुजय विखे, माजी खासदार

जनशक्तीचा विजय

आपली निवडणूक संगमनेरच्या स्वाभिमानी जनतेने हातात घेतली होती. धनशक्तीविरुद्ध जनशक्तीच्या या लढाईत जनशक्तीचा विजय झाला. आपण विकासाच्या राजकारणाला महत्त्व देणार आहोत. शेतकरी, युवा, महिला यांच्यासाठी काम करताना टँकर मुक्त संगमनेर करण्याचा प्रयत्न राहील. हा विजय संगमनेरच्या मायबाप जनतेला समर्पित करतो. – अमोल खताळ, नवनिर्वाचित आमदार, संगमनेर

Story img Loader