सांगली : शालेय मुलांचे गणवेश तयार करण्याचे काम महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) महिला बचत गटामार्फत केले जात असून यातून जिल्ह्यातील ३७५ महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. यामुळे महिला बचत गटांना आधार मिळाला असल्याचे मत पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी शनिवारी व्यक्त केले.

मिरज तालुययातील सावळी येथील केंद्रशाळेत पालकमंत्री डॉ. खाडे, खासदार विशाल पाटील व मान्यवरांच्या हस्ते मुलांना गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, मिरज पंचायत समितीचे सहायक गट विकास अधिकारी ज्ञानदेव मडके, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. चीक्कलगी, गावाचे सरपंच, उपसरपंच, स्थानिक शिक्षण व्यवस्थापन समिती, संबंधित केंद्र प्रमुख व मुख्याध्यापक आदी उपस्थित होते.

Kavalapur airport, Sangli,
सांगली : कवलापूर विमानतळ जागेची पुढील आठवड्यात पाहणी
murder, youth, Tembhurni,
सोलापूर : टेंभुर्णीजवळ अनोळखी तरुणाच्या हत्येचा उलगडा; तेलंगणातील आई व बहिणीने मारेकऱ्यांना दिली होती सुपारी
Satara, CBI, case, former president,
सातारा : किसन वीर कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकारी संचालकांवर सीबीआयचा गुन्हा दाखल
Praful Patel
अजित पवार गटातून केंद्रात कोण मंत्री होणार? प्रफुल्ल पटेलांचं मोठं विधान; म्हणाले, “मंत्रीपद मिळणार असेल तर ते…”
Prataprao Chikhalikar
लोकसभा निवडणुकीत पराभव का झाला? प्रताप पाटील चिखलीकरांनी सांगितली तीन कारणं; म्हणाले, “राज्यात जो फॅक्टर…”
Devendra Fadnavis On Konkan Graduates Constituency
“महायुतीला तडीपार करणार म्हणणाऱ्यांना…”, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, “कोकणाने…”
body, baby, buried, graveyard,
सोलापुरात स्मशानभूमीत पुरलेला बाळाचा मृतदेह तिसऱ्याच दिवशी गायब
Solapur, Water, Ujani dam,
सोलापूर : उजनी धरणात दहा दिवसांत दहा टक्के वधारला पाणीसाठा

हेही वाचा – “ईव्हीएम आणि मोबाईलचा संबंध…”, किर्तीकर अन् वायकरांच्या वादावर निवडणूक अधिकाऱ्यांचा मोठा खुलासा; म्हणाले, “ईव्हीएम…”

जिल्ह्यातील १० तालुके व सांगली, मिरज आणि कुपवाड शहर असे १३ ठिकाणच्या शाळांना मोफत गणवेश देण्यात येणार असल्याचे माविम वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी कुंदन शिनगारे यांनी सांगितले. तसेच नियमित गणवेश तयार करून ते शाळांना देण्यात येणार आहेत. यामध्ये नियमित गणवेश संख्या १ लाख २५ हजार २६९ इतकी आहे. माविममार्फत स्थापित लोकसंचलित साधन केंद्रामार्फत गारमेंट युनिट, बचत गटातील महिलांना गणवेश शिलाईचे काम देण्यात आले आहे. यामध्ये महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा व महिलांना आर्थिक लाभ मिळावा हा मुख्य हेतू आहे. या उपक्रमातून जिल्ह्यातील एकूण १० महिला संचलित गारमेंटमधील ३७५ महिलांना रोजगार मिळाला असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तालुका व केद्रातील शाळेनुसार गणवेश पॅकिंग करण्यात आले आहेत. जेणेकरून गणवेश वाटप करताना कोणतीही अडचण येणार नाही. गणवेशाच्या कामामुळे महिलांना मोठा आर्थिक लाभ झाल्याचे माविमचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी शिनगारे यांनी सांगितले.

हेही वाचा – “आमचीही २८८ जागांवर लढण्याची तयारी…”, छगन भुजबळ यांच्यानंतर प्रफुल पटेलांचे जागावाटपावर मोठे भाष्य

कार्यक्रमास सहायक जिल्हा समन्वय अधिकारी उमराणीकर, लेखाधिकारी कुलकर्णी, व्यवस्थापक मनोज आवटी, सहयोगिनी दिपाली पाटील तसेच नवप्रभा लोकसंचलीत साधन केंद्राच्या अध्यक्षा श्रीमती वर्षा कबाडे उपस्थित होत्या. त्याचप्रमाणे कडेगाव तालुक्यातील चिंचणीअंबक, वाळवा तालुक्यातील कोरेगाव, बहादूरवाडी, गोटखिंडी आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील कोकळे, कुकटोळी, उम्बर वडा, रांजणी येथे मुख्याध्यापक, शिक्षण विस्तार अधिकारी व सीएमआरसी प्रतिनिधी यांच्या हस्ते गणवेश वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.