कृषी विभागाच्या गुण नियंत्रण पथकाने पोलासासमवेत मणेराजुरी (ता. तासगाव) येथील मळ्यात छापा टाकून सात लाख ७८ हजारांचा बोगस रासायनिक खताचा साठा जप्त केला. गुजरातमधील नँशनल फर्टिलायझरच्या नावाने या खताचे पँकिंग करण्यात येत होते.

गुण नियंत्रक पथक आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखालील पोलीस पथक यांनी मणेराजुरी येथील एका पोल्ट्री शेडवर गुरुवारी छापा टाकला. यावेळी ट्रक (आरजे १४ जेएच ०९८८) मधून खताची पोती उतरविण्यात येत होती. शेडमध्ये विना लेबल रासायनिक मिश्र खत, गोळी व दाणेदार खत यांची पन्नास किलो वजनाची पोती आढळली.

Nashik, Teams inspection, auction,
नाशिक : खासगी जागेवर कृषिमाल लिलावामुळे तपासणीसाठी पथके नियुक्त
air pollution control system has been in dust since three months
पिंपरी : हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा तीन महिन्यांपासून धूळखात
धूळ नियंत्रण वाहनांमुळे नागरिकांबरोबरच झाडांचाही मोकळा श्वास
chhagan bhujbal, armstrong company
भुजबळ यांच्या आर्मस्ट्राँग कंपनीला जिल्हा बँकेकडून २६ कोटींचा लाभ, थकीत कर्जफेडीसाठी ‘ओटीएस’ योजनेत सहभाग

खत निर्मिती, विक्री याचा परवाना नसताना साठा, पँकिंग करण्यात येत असल्याचे दिसून आले. या ठिकाणी ३६.९० टन खत बनावट असल्याच्या संशयावरून जप्त करण्यात आले. याचे बाजारी मूल्य ७ लाख ३८ हजार रुपये आहे.

या प्रकरणी खताचा व्यवसाय करणारे मुजाहिद मुजावर (वय २५) व रमजान मन्सूर मुजावर (वय २७ दोघे रा. मणेराजुरी) या दोघाविरुध्द तासगाव पोलीस ठाण्यात गुण नियंत्रक सुरेंद्र पाटील यांनी फिर्याद दिली आहे.