सांगली : महाविद्यालयात जात असताना एका विवाहित तरुणीवर पतीने कोयत्याने हल्ला केल्याची घटना बुधवारी सकाळी शहरातील कॉलेज कॉर्नरवर घडली. हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून उपचारासाठी तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हेही वाचा - शिक्षकांना जुन्या निवृत्तिवेतनासाठी समिती; मुख्यमंत्र्यांची घोषणा; २६,९०० जणांना लाभ होण्याची शक्यता हेही वाचा - Jitendra Awhad : “अजित पवार गटाला काहीही करून…”, जितेंद्र आव्हाडांची खोचक टीका दोघांचा काही महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून दोघांमध्ये वाद झाल्याने सध्या विभक्त राहात होते. प्रांजल काळे असे युवतीचे नाव आहे. सहा महिन्यांपूर्वी संग्राम शिंदे याच्याशी प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरु होते. पतीविरुद्ध तिने तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता, अशी माहिती मिळत असून पोलीस अधिक माहिती घेत आहेत.