scorecardresearch

महापुरुषांच्या सन्मानार्थ सांगलीत बंद

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ महामानवांचा अवमान करणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.

महापुरुषांच्या सन्मानार्थ सांगलीत बंद
महापुरुषांच्या सन्मानार्थ सांगलीत बंद

महामानवांच्या बदनामीच्या निषेधार्थ आणि महापुरुषांच्या सन्मानार्थ सर्व पुरोगामी संघटनाकडून पुकारलेल्या बंदला सांगलीकरांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्याने गुरुवारी बहुतांशी व्यवहार ठप्प झाले.

हेही वाचा- “सरकारविषयक वाईट प्रतिमा निर्माण होत आहे,” पडळकरांचं देवेंद्र फडणवीसांना पत्र

सांगली शहरात महामानवांच्या बदनामीच्या निषेधार्थ आणि महापुरुषांच्या सन्मानार्थ सर्व पुरोगामी संघटनाकडून सांगली शहर बंदची हाक देण्यात आली. पुरोगामी संघटना मधील कार्यकर्ते, शिवप्रेमी, बाबासाहेब आंबडेकर प्रेमी स्टेशन चौक सांगली येथे सकाळी १० वाजता एकत्र जमले. तेथून मारुती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यत पदयात्रा काढून महाराजाना वंदन करण्यात आले. यानंतर शहरातील बाबासाहेब आंबडेकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासह अन्य महापुरुषांच्या पुतळ्याला देखील अभिवादन करण्यात आले.

हेही वाचा- मोदी नव्या भारताचे राष्ट्रपिता म्हणणाऱ्या अमृता फडणवीसांच्या विधानावरून काँग्रेसची भाजपावर टीका

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ महामानवांचा अवमान करणाऱ्या प्रवृत्तीचा घोषणा देऊन धिक्कार करण्यात आला. राज्यपाल कोश्यारी हटावच्याही घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनामध्ये मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष डॉ. संजय पाटील, जिल्हा बॅंकेचे संचालक बाळासाहेब वनमोरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शेखर माने, प्रा. पद्माकर जगदाळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, विकास मगदूम, किरण कांबळे, मुनीर मुल्ला आदी उपस्थित होते

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-12-2022 at 15:24 IST

संबंधित बातम्या