घरासमोर खेळत असलेल्या पाच वर्षाच्या मुलीवर सात-आठ भटक्या श्वानांनी हल्ला करुन जखमी केले. मिरजेतील वेताळबानगरमध्ये बुधवारी सकाळी ही घटना घडली असून मुलीला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिरजेतील वेताळबा नगर येथील जैनुबी जुबेर जमादार ही पाच वर्षाची मुलगी घरासमोर गेटच्या आत खेळत असताना दीड वाजण्याच्या सुमारास अचानक सात ते आठ मोकाट कुत्र्यांनी झुंडीने हल्ला केला. तिच्या मांडीवर, हातावर, पाठीवर, गुडख्यावर जखमा झाल्या आहेत. तिला मोकाट कुत्री
ओढत गेटमधून बाहेर घेवून जात असताना मुलीच्या आरडा ओरड्याने शेजारी तसेच मुलीचे वडील जुबेर जमादार हे बाहेर आले. त्यांनी कुत्र्यांच्या तावडीतून मुलीची सुटका केली. उपचारासाठी मुलीला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.