scorecardresearch

नागाचे मुके घेणारे इन्स्टाग्राम ‘रिल्स’ बनवणं तरुणाला पडलं महागात; सांगलीमधील घटनेने अधिकारीही अवाक

नागासोबत थरारक व्हिडीओ तयार करुन सोशल मीडियावर व्हायरल करणं चांगलंच महागात पडलं

नाग पाहिला की अनेकांची भंबेरी उडते. पण याच नागासोबत एक तरुण जीव धोक्यात घालून खेळत असल्याचा प्रकार समोर आला आहे. इतकंच नाही तर हा तरुण या नागाचे मुके घेतानाचे व्हिडीओ शूट करत ते इन्स्टाग्राम रिल्ससाठी वापर होता. सांगलीच्या बावची येथील या सर्पमित्राला नागासोबत थरारक व्हिडीओ तयार करुन सोशल मीडियावर व्हायरल करणं चांगलंच महागात पडलं आहे.

नागासोबत जीवघेणा खेळ करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. वाळवा तालुक्यातल्या बावची येथील २२ वर्षीय प्रदिप अडसूळे या तरुणाला वन विभागाने बेड्या ठोकल्या आहेत. .नाग पकडून त्याच्यासोबत व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर प्रसारित केल्याबद्दल वन्य जीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत त्याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

प्रदीप हा नागांना पकडून त्यांच्यासोबत वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बनवत होता. तसंच सोशल मीडियावर शेअर करत होता. सदरच्या व्हिडिओबाबतची माहिती इस्लामपूर वनविभागाला मिळाली, त्यानंतर इस्लामपूर वनविभागाकडून त्याबाबतची पडताळणी करत प्रदीप अडसूळ याला शोधून त्याच्यावर गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे अशी माहिती वनाधिकारी अजित साधणे यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sangli forest officials arrest yongster for making instagram reels of kissing snake sgy

ताज्या बातम्या