scorecardresearch

सांगलीत देशातील सर्वात मोठी विजार; जागतिक शिलाई दिनानिमित्त निर्मिती

पन्नास मीटर कापड वापरून तयार केलेली तब्बल २६ फूट उंची आणि १५ फूट कमरेचा व्यास असलेली देशातील सर्वात मोठी विजार सांगलीमध्ये बुधवारी फडकली. 

सांगलीत देशातील सर्वात मोठी विजार; जागतिक शिलाई दिनानिमित्त निर्मिती
सांगलीत प्रदर्शित करण्यात आलेली देशातील सर्वात मोठी विजार.

सांगली : पन्नास मीटर कापड वापरून तयार केलेली तब्बल २६ फूट उंची आणि १५ फूट कमरेचा व्यास असलेली देशातील सर्वात मोठी विजार सांगलीमध्ये बुधवारी फडकली. सांगलीतील प्रसिद्ध शिलाई व्यावसायिक इम्रान मलिदवाले यांनी ही भली मोठी विजार जागतिक शिलाई दिनाचे औचित्य साधून या वर्षी २८ फेब्रुवारी २२ तयार केली होती. येथे भरलेल्या ‘सांगली फेस्टिव्हल’मध्ये आज ती प्रदर्शित करण्यात आली.

या विजारीसाठी ५० मीटर इतके कापड लागले असून शिवल्यानंतर तिची उंची तब्बल २६ फूट (३१२ इंच) इतकी, तर कमरेचा व्यास १५ फूट एवढा आहे. ही विजार बनवण्यासाठी तब्बल ८ दिवस एवढा वेळ लागला. विजारची खास वैशिष्टय़े म्हणजे बटन सागवान लाकडापासून नक्षीदार कारिगरी करून घेण्यात आले आहेत. तर यासाठी लागणारा बेल्ट एका कंपनीकडून खास मागणी नोंदवून तयार करून घेण्यात आला आहे. पँटला आतून लागणारी ‘ग्रिप’सुद्धा ‘स्पेशल एम्ब्रॉयडरी’ तयार करुन घेण्यात आली आहे. याची ‘चेन’सुद्धा विशेष आहे. ‘ओव्हर लॉक मॅचिंग’ दोऱ्याने मारण्यात आले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-12-2022 at 00:02 IST

संबंधित बातम्या