सांगली : घरगुती वादातून पत्नीचा डोक्यात कुऱ्हाड घालून निर्घृन खून करुन पती स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला. सांगलीतील शिंदेमळा मधील कुरणे गल्लीत गुरुवारी सकाळी ही घटना घडली.अनिता सीताराम काटकर असे मृत महिलेचे नाव आहे. या हल्ल्यात तिचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर पती स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला आहे.

संजयनगर पोलिस स्टेशनमधून मिळालेल्या माहितीनुसार मृत अनिता या भाजी विक्रीचा व्यवसाय करत होत्या. तर पतीही तिच्यासोबत भाजी विक्री करत होता. आज पहाटे साडेपाचच्या सुमारास घरगुती वादातून पती सीतारामने अनिताच्या मानेवर कुऱ्हाडीने घाव घातला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या हल्ल्यात अनिताचा जागीच मृत्यू झाला. खुनाच्या घटनेनंतर पती सीताराम हा स्वतः संजयनगर पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. शिंदेमळा कुरणे गल्लीत घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे.तर घटनेनंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासाणीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल केला. घरगुती वादातूनच खून झाल्याचे समजते.