शेतमजुरी करताना शेततळ्यात पडून मायलेकींचा मृत्यू

शेतमजुरीसाठी गेल्या काही दिवसांपासून त्या मणेराजुरी येथे वास्तव्यास होत्या

Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news
राजुरा इथे हरिनाम सप्ताह सुरु आहे. या सप्ताहामध्ये जेवणानंतर काही मुलांना मळमळ आणि उलटीचा त्रास होऊ लागला.

सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील मणेराजुरीमध्ये शेततळ्यात पडून मंगळवारी मायलेकींचा मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्या दोघीही यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील राहणाऱ्या आहेत. शेतमजुरीसाठी गेल्या काही दिवसांपासून त्या मणेराजुरी येथे वास्तव्यास होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, अंजली दिनेश सुर्वे (वय – २६, रा. बेलोरे, आर्णी, यवतमाळ) आणि त्यांची मुलगी स्नेहल (वय ६) या दोघीजणी मणेराजुरीमध्ये शेतात काम करत असताना शेततळ्यात पडल्या. त्यांना वाचवण्यासाठी कुणाल नावाच्या एका मुलानेही तात्काळ शेततळ्यात उडी मारली. पण या दोघींना वाचविण्यात त्याला अपयश आले. कुणाल मात्र या घटनेत सुखरूप बाहेर आला आहे. मायलेकींचे मृतदेह शेततळ्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sangli manerajuri mother and daughter died farming tank