तासगाव शहरातील धवळवेस येथील शिवनेरी मंडळाचे अध्यक्ष अनिल जाधव यांचा तलवारीने वार करुन खून करण्यात आला. ही घटना गुरुवारी रात्री साडेनऊ च्या दरम्यान घडली. या प्रकाराने तासगावात एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार ढवळवेस येथील काही तरुणांमध्ये कोणत्यातरी जुन्या कारणावरून वाद धुमसत होता. यातून बाचाबाची, शिवीगाळ, बघून घेण्याची भाषा वापरली जात होती. हा वाद मिटवण्यासाठी शिवनेरी मंडळाचे अध्यक्ष अनिल जाधव व अन्य काही तरुण रात्री साडे नऊच्या दरम्यान ढवळवेस येथील चौकात थांबले होते.

shares market, stock prices
तेजीला पूर्णविराम की स्वल्पविराम?
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?
three workers died due to electric shock
अंबरनाथ: विजेच्या धक्क्याने तीन कामगारांचा मृत्यू, जांभूळ जल शुद्धीकरण केंद्रातील घटना
scorching heat
उन्हाच्या झळांनी हापूस आंबा काळवंडला; डाळिंब, द्राक्ष, भाजीपाल्यावर परिणाम

यावेळी अचानक आलेल्या हल्लेखोरांनी अनिल जाधव यांच्यावर तलवारीने डोक्यात वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्याचा ते प्रतिकार करू शकले नाहीत. घाव वर्मी लागल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले. उपचारासाठी त्यांना तासगाव येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र ते उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

शेकडो तरुणांची रुग्णालयाबाहेर एकच गर्दी –

घटनेची माहिती मिळताच तासगाव पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत हल्लेखोरांचा तपास सुरू केला. हल्ल्याची माहिती मिळताच शेकडो तरुणांनी रुग्णालयाबाहेर एकच गर्दी केली होती. या घटनेने तासगावात एकच खळबळ उडाली आहे.