सांगली : वारणेला आलेल्या महापुरात घुणकी (जि. कोल्हापूर) येथून वाळवा तालुक्यातील एक जण वाहून गेला असून महापुरात पोहणार्या दोन तरुणांना शुक्रवारी बचाव पथकाने वाचविले. पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीचा आज दिवसभर शोध घेण्यात आला, मात्र तो सापडलेला नाही. नजीर अहमद मेहीबूबसाब काखनडी (वय ४६, रा. कुंडलवाडी, ता. वाळवा) हे गुरुवारी आपल्या गावी (एमएच १० बीएम ८४२८) या मोटारीतून परतत असताना मोटार घुणकी येथे नदीपात्रात पडली. मोटारीसह ते बेपत्ता झाल्याने याची माहिती पेठ वडगाव पोलिसांना देण्यात आली. मोटारीच्या ठावठिकाणाबाबत जीपीएस यंत्रणेद्वारे शोध घेतला असता वारणा नदीपात्रात बेपत्ता झालेली चारचाकी मिळाली. मात्र, काखनडी यांचा तपास लागलेला नाही. त्यांचा शोध सुरू आहे. हेही वाचा - सांगलीत पाणी इषारापातळीकडे, पावसाचा जोर मंदावल्याने दिलासा हेही वाचा - Uddhav Thackeray : “उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंची पाद्यपूजा करायला हवी होती”, ‘त्या’ कृतीवरून मनसेचा टोला दरम्यान, शुक्रवारी सांगलीतील आयर्विन पुलावरून चार तरुणांनी महापुरात पोहण्यासाठी उड्या मारल्या. मात्र, यापैकी दोघांना वेगवान प्रवाहामुळे दम लागला. त्या दोन तरुणांनी नदीपात्रात असलेल्या खांबाला धरून मदतीसाठी आरडाओरडा केला. बचाव पथकाने दोरीच्या मदतीने त्यांना नदीकिनारी आणले.