कर्नाटकात नोंदणी झालेल्या मोटारीतून सांगली शहर पोलिसांनी ७५ लाख रुपयांची रोकड जप्त केली. मोटारीतील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सांगली शहरातील सिटी पँलेस हाँटेलजवळ रात्रीच्या वेळी हा प्रकार उघडकीस आला. स्विफ्ट डिझायर मोटारीतून ७५ लाख रुपये जप्त केल्याप्रकरणी आटपाडी येथील आकाश नारायण केंगार, सुनील शहाजी कदम आणि महेंद्र लक्ष्मण जावीर या तिघांना ताब्यात घेतले आहे.

सांगली शहरात एका खासगी मोटारीतून मोठी रोकड येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनुसार पोलीस पथकाने सापळा लावला होता. यावेळी स्विफ्ट डिझायर (केए ५५ एम ८०३७) ही मोटार संशयास्पद आढळली. या मोटारीची झडती घेतली असता निळ्या रंगाच्या बॅगेत नोटांची बंडले आढळली. ही रक्कम कोठून आणली, कोणाच्या मालकीची आहे, याबाबत मोटारीत असलेल्या तिघांना समाधानकारक खुलासा करता आला नाही.

Pune police checking, gangsters gun, 2 Incidents of Gun Violence, Gun Violence Reported in pune, firing in hadapsar, firing on jangli maharaj road, firing in pune, violence in pune, pune police, crime news, marathi news,
पुणे : गुंडांच्या झाडाझडतीनंतर शहरात गोळीबाराच्या दोन घटना,जंगली महाराज रस्ता, हडपसर भागात गोळीबार
nashik pakistan zindabad slogans marathi news
उपनगर पोलीस ठाण्याबाहेर जमावाकडून पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, भाजप आमदार देवयानी फरांदे यांची तक्रार
baba kalyani s niece nephew move court over property dispute
भारत फोर्जचे अध्यक्ष बाबा कल्याणी यांच्या कुटुंबीयांत संपत्तीचा वाद; कल्याणी यांच्या भाच्यांकडून दिवाणी न्यायालयात दावा
Mephedrone manufacturing factory in Sangli was raided by Mumbai Police Crime Branch Mumbai news
उत्तर प्रदेशात प्रशिक्षण घेऊन सांगली एमडीचा कारखाना उघडला; अडीचशे कोटींचे एमडी जप्त, १० जणांना अटक

हेही वाचा : पुणे: कोलकाता विरुद्ध लखनऊ सामन्या दरम्यान ‘दस का बिस’, चढ्या दराने तिकीट विक्री करणाऱ्याला बेड्या

यानंतर पोलिसांनी रोकडसह मोटार जप्त केली. तसेच आरोपी असलेल्या तिघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. याबाबत प्राप्तीकर विभागाला कळविण्यात येणार असून त्यांच्या ताब्यात ही रोकड दिली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.