scorecardresearch

सांगलीत ५० घरफोडींचे गुन्हे उघडकीस; चार आरोपींकडून १५ लाख ४५ हजार किमतीचा माल जप्त

सांगली पोलिसांनी ५० घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या गुन्ह्यांमध्ये चार आरोपींकडून १५ लाख ४५ हजार रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.

सांगलीत ५० घरफोडींचे गुन्हे उघडकीस; चार आरोपींकडून १५ लाख ४५ हजार किमतीचा माल जप्त
सांगली पोलीस

सांगली पोलिसांनी ५० घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या गुन्ह्यांमध्ये चार आरोपींकडून १५ लाख ४५ हजार रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागने ही कारवाई केली.

आरोपींकडून १२ लाख ५० हजार रुपये किमतीचे २५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, १,५०,००० रुपये किमतीचे दीड किलो वजनाचे चांदीचे दागिने, गुन्ह्यातील चोरीस गेलेली ९५,००० रुपये रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेल्या ५०,००० रुपये किमतीच्या दोन मोटार सायकल असा एकूण १५ लाख ४५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जलस्वराज प्रकल्प कारंदवाडी या ठिकाणी छापा मारुन मोबाईल भैरु पवार (वय १९, रा. करंजवडे, ता. वाळवा, जि. सांगली), घायल संरपच्या काळे (वय ४६, रा. चिकुर्डे, ता. वाळवा, जि. सांगली) यांना ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा : सांगली : तीन दिवसाच्या मुलीची हत्या करणाऱ्या आईला जिल्हा सत्र न्यायालयाने दिली जन्मठेपेची शिक्षा

तसेच खोत पोल्ट्री फार्म डोंगरवाडी या ठिकाणी छापा मारुन इकबाल भैरु पवार (वय ४०, रा. करंजवडे, ता. वाळवा आणि प्रविण राज्या शिंदे (वय ३१, रा. गणेशवाडी वडुज, ता. खटाव, जि. सातारा) यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sangli police arrest 4 criminals involved in 50 robbery rno news pbs

ताज्या बातम्या