Shirala Court on Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात सांगलीमधील शिराळा कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट काढलं आहे. राज ठाकरेंना ११ जुलैला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. वारंवार गैरहजर राहिल्याने शिराळा न्यायदंडाधिकाऱ्यांनी २८ एप्रिल २००२ रोजी राज ठाकरे यांच्यासह १० जणांविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावलं होतं. याप्रकरणी ८ जूनला सुनावणी झाली असता राज ठाकरे गैरहजर राहिले. यानंतर कोर्टाने राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढलं आहे.

शिराळा कोर्टाने २००८ मध्ये राज ठाकरेंच्या अटकेनंतर झालेल्या आंदोलनप्रकरणी एप्रिल महिन्यात वॉरंट काढलं होतं. पण राज ठाकरेंना करोनाची लागण झाली असल्याने बुधवारी झालेल्या सुनावणीला गैरहजर राहिले. मनसेचे नेते शिरीष पारकर या सुनावणीसाठी उपस्थित होते. त्यांना कोर्टाने जामीन मंजूर केला. पण राज ठाकरे गैरहजर राहिल्याने त्यांच्याविरोधात पुन्हा एकदा अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आलं आहे.

After Salman khan house firing incident arpita khan visited Nizamuddin Dargah
सलमान खानच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर अर्पिता खान पोहोचली निजामुद्दीन दर्ग्यात; व्हिडीओ व्हायरल
salman khan galaxy apartment firing case
“सलमानला जीवे मारण्याच्या उद्देशाने गोळीबार”, पोलिसांनी दिली माहिती; म्हणाले, “दोन्ही आरोपी…”
Nita Ambani Dance on Zingaat in ajay-atul live concert in nmacc
Video: अजय-अतुलच्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये थिरकल्या नीता अंबानी, ‘झिंगाट’वर केला डान्स, पाहा व्हिडीओ
shah rukh khan greet fans on the occasion eid
Video : शाहरुखचे ‘जबरा फॅन्स’! मन्नतबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी, किंग खानने लेक अबरामसह दिल्या ईदच्या शुभेच्छा

२००८ सालचं आहे प्रकरण –

२००८ मध्ये रेल्वे भरतीत स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य द्या या मागणीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनात कल्याण कोर्टाच्या आदेशाने राज ठाकरेवर अटकेची कारवाई झाली होती. या अटकेच्या निषेधार्थ शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी गावात मनसे कार्यकर्त्यांनी बंद पुकारला आणि जबरदस्तीने दुकाने बंद करण्यास दुकानदारांना भाग पाडलं होतं.

विनापरवाना बंद पुकारल्यामुळे शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी शिराळा प्रथमवर्ग न्यायालयात राज ठाकरे यांच्यासह १० मनसे कार्यकर्त्यांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.