सांगली : जिल्हा बँकेचे मतदार पळवापळवीवरुन राडा ; आमदार पडळकरांच्या गाडीवर दगडफेक!

काहीजण जखमी झाले देखील झाले आहेत; आटपाडीमध्ये तणाव, पोलीस बंदोबस्त वाढवला.

(संग्रहित छायाचित्र)

जिल्हा बँकेचे मतदार पळवापळवीवरुन आटपाडी मध्ये रविवारी सायंकाळी दोन गटात जोरदार हाणामारी झाली. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि शिवसेना – राष्ट्रवादी यांच्यात मोठा वाद झाल्याची प्राथमिक माहिती असून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. आमदार पडळकर यांच्या कारसह काही गाड्यांवर दगडफेक करण्यात आली. काहीजण जखमी झाले आहेत.

जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू असून मंगळवारी अर्ज माघारी नंतर चित्र स्पष्ट होणार आहे. मतदार संख्या अवघी अडीच हजार असल्याने मतदार पळवापळवीवरुन आटपाडी येथील साठे चौकात राडा झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेश सरचिटणीस राजू जानकर यांच्या अंगावर मोटार घातल्याचा आरोप करण्यात आला. यामध्ये जानकर यांचा पाय मोडला असल्याचे सांगण्यात आले. आटपाडी मध्ये तणाव निर्माण झाला आहे. पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sangli stone pelting on mla padalkars car msr

Next Story
नाकर्त्यां लोकप्रतिनिधींमुळे पूरग्रस्त अन्नछत्रात!
ताज्या बातम्या